राज्य पाेलिस दलातील अधिकाऱ्यांमध्ये आनंदीआनंद

    दिनांक :18-Apr-2026
Total Views |
- 498 पाेलिस उपनिरीक्षकांना मागितले महसूल संवर्ग

अनिल कांबळे
नागपूर, 
Police promotion राज्य पाेलिस दलातील पाेलिस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची पदाेन्नती रखडली हाेती. त्यामुळे पाेलिस अधिकाऱ्यांंमध्ये खदखद व्यक्त केल्या जात हाेती. मात्र, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेऊन राज्यातील तब्बल 498 पाेलिस उपनिरीक्षकांना सहायक पाेलिस निरीक्षक पदावर पदाेन्नती देण्यासाठी महसूल संवर्ग यादी जाहीर केली. या निर्णयामुळे पाेलिस दलात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
 
police
 
राज्य पाेलिस दलात गेल्या काही महिन्यांपासून Police promotion  पदाेन्नतीवरुन पाेलिस अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण हाेते. 2013 चे अर्हता प्राप्त पाेलिस हवालदार, पाेलिस उपनिरीक्षक, सहायक पाेलिस निरीक्षक आणि पाेलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या पदाेन्नत्या रखडल्या हाेत्या. पदाेन्नतीच्या कक्षेत असल्यानंतरही पदाेन्नतीची यादी जाहीर हाेत नसल्यामुळे पाेलिस अधिकारी खदखद व्यक्त करीत हाेते. तसेच आज-उद्या पदाेन्नतीची यादी निघेल, या आशेवर बसलेल्या पाेलिस अधिकाऱ्यांचे कर्तव्य पार पाडताना जीव भांड्यात पडत हाेता. त्यामुळे राज्यातील शेकडाे पाेलिस अधिकारी पदाेन्नतीच्या यादीची चातकाप्रमाणे वाट बघत हाेते. त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पाेलिस अधिकाèयांची ही अडचण लगेच साेडवली. गृहमंत्र्यांनी गुरुवारीच सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे पाेलिस महासंचालक कार्यालयातून पाेलिस उपनिरीक्षकांना सहायक पाेलिस निरीक्षक पदावर पदाेन्नती देण्यासाठी महसूल संवर्ग मागण्यासाठी यादी जाहीर केली. या यादीत सर्वाधिक पाेलिस उपनिरीक्षक मुंबई आणि पुणे आयुक्तालयातील आहेत. पाेलिस उपनिरीक्षकांना 22 एप्रिलपर्यंत महसूल संवर्ग मागविण्यात आले आहे.
एपीआय अधिकाऱ्यांच्या 507 रिक्त जागा
Police promotion सध्या राज्य पाेलिस दलात 507 सहायक पाेलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा जागा रिक्त आहेत. त्यामध्ये सर्वाधिक रिक्त जागा काेकण आणि पुणे विभागात आहेत. काेकणमध्ये 269 जागा तर पुण्यात 104 अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. तिसऱ्या क्रमांकावर नागपूर असून 47 जागा रिक्त आहेत. तर नाशिकमध्ये 31 तर छत्रपती संभाजीनगरात 29 जागा रिक्त आहेत. अमरावती विभागात 21 एपीआयच्या जागा रिक्त आहे.
पाेलिस निरीक्षकांना ‘खुशखबर’ केव्हा?
पदाेन्नतीच्या कक्षेत असलेल्या राज्यभरातील पाेलिस निरीक्षकांना गेल्या डिसेंबर 2025 मध्येच यादी जाहीर झाली हाेती. मात्र, साडेतीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लाेटल्यानंतरही पाेलिस निरीक्षकांना सहायक पाेलिस आयुक्त, डीवायएसपी पदावर पदाेन्नती देण्यात आली नाही. मात्र, पुढच्या आठवड्यात पाेलिस निरीक्षकांनाही पदाेन्नती मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.