हिंगणघाट
Women's reservation bill महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेससह विरोधी पक्षाने लोकसभेत विरोध करून महिलांसोबत विश्वासघात केला. आजचा दिवस काळा दिवस ठरला. विधेयकाच्या विरुद्ध मतदान करणार्या सदस्यांचा निषेध करते अशी संतप्त प्रतिक्रिया नप अध्यक्ष डॉ. नयना तुळसकर यांनी व्यत केली.
Women's reservation bill या विधेयकाला विरोध करून विरोधी पक्षानी भारतातील मातृशक्तीचा अपमान केला आहे. हा काँग्रेस व विरोधी पक्षाचा महिला विरोधी चेहरा आम्ही जनतेसमोर उघड करू असे मत त्यांनी व्यत केले. एकीकडे स्त्री पुरुष सामानते बद्दल मोठमोठ्या गोष्टी केल्या जातात आणि जेव्हा महिलांनासाठी काही करण्याची वेळ येते तेव्हा विरोध करून काय सिद्ध करायचं आहे विरोधकांना असा सवाल त्यांनी व्यत केला.
हा सत्तारूढ पक्षाचा राजकीय अजेंढा : डोंगरे
Women's reservation bill महिला आरक्षण विधेयक नारी वंदन अधिनियम २०२३ या नावाने पास झालेले आहे. त्याचा १३१ संविधान संशोधन बिल परित न झाल्याचा किंवा दोन तृतीयांश बहुमताऐवजी पडण्याचा काहीच संबंध नाही आहे. जनगणना डिलिमिटेशन झालं पाहिजे हा मुद्दा स्वतःच्या फायद्यासाठी वाढवण्यासाठी होता. हे बिल लोकसभेत पारीत न होण्यासाठी विरोधी पक्षाचा कोणताही संबंध नाही. बिल पारीत करण्याची जबाबदारी ही सत्तापक्षाची असते व त्यासाठी कोणतेही नियोजन सत्ता पक्षाने केल्याचे दिसून येतं नाही हे बिल पारीत न होण्यासाठी सत्तारूढ पक्ष पूर्णतः जबाबदार आहे. सरकारचे हे मोठं अपयश आहे, असे मत शरद पवार गटाच्या महिला नेत्या शुभांगी डोंगरे यांनी व्यक्त केले आहे.