मराठी नाही तर शाळांची मान्यता रद्द

शिक्षण राज्यमंत्री डॉ. भोयर

    दिनांक :18-Apr-2026
Total Views |
वर्धा
 Dr. Pankaj Bhoyar. Wardha राज्यातील इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या शाळांमध्ये मराठी भाषा सतीची करण्यात आली आहे. या नियमांची पायपल्ली करणार्‍या शाळांची मान्यता काढून घेण्याचे अधिकार शिक्षण विभागाला देण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिली.
 
pankaj bhoyar 
Dr. Pankaj Bhoyar. Wardha  राज्याच्या प्रचलित भाषा सुत्रानुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सतीचे करण्यात आले आहे. मात्र, काही शाळांमध्ये मराठी भाषा शिकवित नसल्याबातच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याअनुषंगाने राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने मराठी भाषा न शिकविणार्‍या शाळांची मान्यता काढण्याचा निर्णय १७ एप्रिल रोजी निर्गमित करण्यात आल्याचे शिक्षण राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी सांगितले. सर्व व्यवस्थापनाच्या माध्यमांच्या व मंडळाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकविण्यासाठी शिक्षकाची नियुती करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
Dr. Pankaj Bhoyar. Wardha शाळांमध्ये या आदेशाची अंमलबजावणी होत आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, शिक्षा निरीक्षक यांचे पथक नेमून त्यामध्ये मराठी विषयाच्या अनुभवी व अर्हताधारक शिक्षकाचा समावेश करण्याची सूचना देण्यात आली आहे. मराठी भाषा धोरणाची अंमलबजावणी होत आहे की नाही याची पडताळणी शाळा सुरू झाल्याच्या दोन महिन्यात करून तसा अहवाल शिक्षण संचालकांना सादर करावा लागणार आहे. उल्लंघन करणार्‍या शाळांच्या व्यवस्थापनाला नोटीस देणे व त्यांच्याकडून तसा खुलासा १५ दिवसाच्या आंत घेऊन विभागीय उपसंचालकांकडे सादर करावा लागणार आहे. Dr. Pankaj Bhoyar. Wardha  उल्लंघन केल्यास शाळा व्यवस्थापनावर १ लाख रुपये दंड व आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या नंतर ही शाळा व्यवस्थापनाने आदेशाचे पालन न केल्यास शाळेची मान्यता काढून घेतल्या जाणार आहे, अशी माहिती शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिली.