धानोरा,
dr milind narote लोकांच्या गरजा लक्षात घेऊन रांगी येथील ताडमटोला येथे समाज भवन उभारण्यात आले, समाज भवन हे सार्वजनिक असून ते सामाजिक कार्य आणि कल्याणकारी कामासाठी उपयोगात आणावे, असे आवाहन आमदार डॉ. मिलींद नरोटे यांनी केले.
आमदार डॉ. मिलींद नरोटे यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत ताडमटोला येते समाज भवन इमारतींचे बांधकाम करण्यात आले. या समाज भवानाचा उद्घाटन शुक्रवारी, 17 एप्रिल रोजी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शशिकांत कृषी बाजार समितीचे सभापती साळवे होते.dr milind narote भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकार, भाजपा तालुकाध्यक्ष साजन गुंडावार, सरपंच फालेश्वरी गेडाम, ग्राम विकास अधिकारी मकरंद बांबोळे, उपविभागीय अभियंता मसराम, अभियंता कोडाप, तंटामुक्त समिती अध्यक्ष तुळशीराम भुरसे, सारंग साळवे, नगरसेवक संजय कुंडू, सुभाष धाईत, सुभाष खोबरे, नंदू कुनघाडकर, श्रावण देशपांडे, देवराव कुनघाडकर, नंदू मडावी, चंदू टेकाम, ताडमटोला येथील महिला मंडळ, पुरुष मंडळ आणि रांगी येथील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नरेंद्र भुरसे यांनी केले. संचालक नितीन कावळे यांनी तर आभार जगदिश कन्नाके यांनी केले.