वणी,
Sant Gadge Baba Amravati University संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत शिक्षण घेणार्या पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या सुप्त साहित्यिक गुणांना वाव आता दरवर्षी सर्व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. याबाबतचा राज्यपाल नामीत अधिसभा सदस्य गजानन कासावार यांनी मांडलेला प्रस्ताव विद्यापीठाच्या अधिसभेत सर्वानुमते मंजूर झाला असून यावर्षीपासून या उपक‘माची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
या संदर्भातील प्रस्ताव अधिसभा सदस्य गजानन कासावार यांनी २९ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या अधिसभेत मांडला विद्यार्थ्यांमधील लेखनकौशल्य, सृजनशीलता आणि साहित्यिक जाण यांना प्रोत्साहन देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी प्रस्तावात नमूद केले होते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार मातृभाषा व साहित्य विषयांना प्राधान्य देण्याच्या दृष्टीने हा उपक‘म महत्त्वाचा ठरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रस्तावाला कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते तसेच विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर यांचे विशेष सहकार्य लाभले. अधिसभेने प्रस्ताव मंजूर केल्यानंतर त्याची अंमलबजावणी विद्यार्थी विकास विभागाकडे सोपविण्यात आली. विभागाने तातडीने कार्यवाही करत विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालयांना दरवर्षी विद्यार्थी साहित्य संमेलन आयोजित करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.
Sant Gadge Baba Amravati University या निर्णयानंतर उपक‘माची सुरुवात अकोल्यातील राधादेवी गोयनका महाविद्यालय आणि बुलढाण्यातील विदर्भ महाविद्यालयात असून त्याला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या साहित्यकृती सादर करण्यासाठी तसेच नव्या साहित्यिकांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक‘म अत्यंत उपयुक्त ठरणार असून भविष्यात राज्यभरातील शैक्षणिक संस्थांसाठीही हा एक आदर्श ठरू शकतो.
याआधी विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात येत असलेल्या युवा महोत्सवात अमरावती जिल्ह्याव्यतिरिक्त इतर जिल्ह्यातील स्पर्धकांवर अन्याय होत असल्याचा मुद्दा करून त्याचा पाठपुरावा केल्यामुळे आता प्रत्येक जिल्ह्यात याबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे. या बाबी विद्यापीठाचे अधिसभा सदस्य गजानन कासावार यांची कार्यक्षमता सिद्ध होते. त्यांच्या या यशामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.