ऐन उन्हाळ्यात शिष्यवृत्ती परीक्षा

विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप

    दिनांक :18-Apr-2026
Total Views |
पुणे
Scholarship exam राज्याच्या शिक्षण विभागाच्या ‘महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे’कडून ऐन उन्हाळ्यात चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येत आहे. राज्यात उन्हाचा पारा ऐन ४४ अंशापर्यंत वाढलेला असताना २६ एप्रिलला शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार आहे.

exam 
 
Scholarship exam येत्या रविवार दिनांक २६  एप्रिलला ही परीक्षा होतेय. सकाळी १० वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याची परीक्षा परिषदेने सूचना जारी केली आहे. मात्र, एकीकडे उन्हानं नवा उच्चांक गाठला असताना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या या अजब निर्णयाने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे.
Scholarship exam दरम्यान, या परीक्षा 26 एप्रिलला सकाळी ११ ते १२.३० पर्यंत भाषा आणि गणित विषयाचा पहिला पेपर असेल. तर दुपारी भर उन्हात २ ते ३.३० या वेळेत इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयांचा पेपर असणार आहे. दोन्ही पेपर प्रत्येकी ७५ गुणांचे असून अनेक ठिकाणी परीक्षा केंद्र हे शहरापासून ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. ऐन उन्हाळ्यात पाल्यांना परीक्षा केंद्रावर घेऊन जाताना पालकांना उन्हापासून संरक्षणाची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. परिणामी, पालकांची आणि विद्यार्थ्यांची यात चांगलीच दमछाक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात उन्हामुळे ठरवलेल्या वेळेआधीच शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत.
Scholarship exam १७ ऑक्टोबर २०२५ रोजी शासन निर्णय घेऊन ५ वी आणि ८ वी साठी असलेली परीक्षा ४ थी  आणि ७ वीसाठी घेण्याचे ठरविण्यात आले. पूर्वीच्या शासन निर्णयानुसार ५ वी आणि ८ वी ची यंदाची परीक्षा २२ फेब्रुवारी २०२६ ला आटोपली. नव्या शासन निर्णयानुसार यंदा ही परीक्षा दोनदा घेतली जात आहे. त्यामुळे शिक्षण विभागाच्या गोंधळाचा विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप होणार आहे.