सरकारी बँकांमध्ये पैशांचा तुटवडा

    दिनांक :18-Apr-2026
Total Views |
ग्राहकांची ससेहोलपट : नागरिकांत खळबळ

उमरखेड, 
Shortage of money in government banks एकीकडे मल्टिनॅशनल बँका तसेच काही सहकारी बँकांनी उमरखेडला ग्राहकांची फसवणूक केल्यानंतर ग्राहकांनी सरकारी बँकांना पसंती दिली होती. परंतु तीन दिवसांपासून सरकारी बँकांमध्ये पैशांचा तुटवडा सुरू आहे. अचानक उद्भवलेल्या रकमेच्या टंचाईमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक व्यवहार कोलमडत आहेत. यामुळे ग्राहकांमध्ये प्रचंड खळबळ आहे. सध्या जीवनावश्यक वस्तू महागल्याने प्रत्येकालाच पैशांचे आहे. शेतकरी वर्गामध्ये खरीप हंगामाच्या नियोजनाची तयारी सुरू आहे व बँकांचे कर्ज वाटप सुरू आहे. अशातच पैशांचा तुटवडा निर्माण झाल्याने पैशांसाठी कडक उन्हाळ्यात सर्वसामान्य जनतेची बँकांकडून ससेहोलपट होत आहे.
 
 
money
 
Shortage of money in government banks उमरखेड शहरातील स्टेट बँकेमध्ये फक्त ५० हजार रुपयांचाच विड्रॉल होत असून सोमवारपर्यंत पुरेल एवढाच पैसा बँकेजवळ आहे. मंगळवारपासून बँक बंद शक्यता निर्माण झाली आहे. सेंट्रल बँकेमध्येसुद्धा १० हजारांचाच विड्रॉल होत असून यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण आहे. उमरखेड शहरामध्ये बँकेच्या या धोरणामुळे जनतेमध्ये अस्वस्थता पसरली आहे. सरकारी बँकांमध्ये ही अवस्था असताना लेकुरवाळी बँक म्हणून परिचित असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ग्राहकांची अवस्था कशी असेल ही कल्पनाच न केलेली बरी, अशा ग्राहकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. यावर रिझर्व बँकेने त्वरित कारवाई करत बँकांना मोठ्या प्रमाणात पतपुरवठा करावा, अशी मागणी जनतेतून होत आहे.
..तर मंगळवारी स्टेट बँक बंद
बँकेत सोमवारपर्यंत पुरतील एवढे पैसे आहेत. आज ५० हजार रुपयांपर्यंत पैसे देता येत आहेत. मंगळवारी बँक बंद ठेवण्याची पाळी अशी भीती आहे.
प्रदीप फटिंग/शाखा व्यवस्थापक
स्टेट बँक ऑफ इंडिया, उमरखेड