श्रावणी चौधरी स्पेल बी स्पर्धेत कारंजा तालुक्यात प्रथम

    दिनांक :18-Apr-2026
Total Views |
कारंजा लाड,
shrawani chaudhary जिल्हा परिषद वाशीमचे प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण जिल्ह्यात इंग्रजी विषयाच्या गुणवत्तेसाठी एक ध्यास गुणवत्तेचा या विषयांतर्गत स्पेल बी हा इंग्रजी विषयाचा सराव घेण्यात आला. यातून मुलांचे इंग्रजी विषयाचे शब्द, वाय आणि ज्ञान संपदा शब्दकोश हे कौशल्य विकसित झाले, त्याच बरोबर इंग्रजी विषयाची गोडी निर्माण झाली. स्पेलबी या उपक्रमाअंतर्गत शाळा ,केंद्र, तालुका हे केंद्रबिंदू ठरवून प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनात स्पर्धा घेण्यात आल्या.
 

श्रावणी चौधरी स्पेल बी स्पर्धेत कारंजा तालुयात प्रथम  
 
 
या शैक्षणिक स्पर्धेत जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक मराठी शाळा सुकळीची वर्ग आठवीची विद्यार्थिनी श्रावणी मंगेश चौधरी ही शाळा स्तरावर, केंद्रस्तरावर आणि तालुकास्तरावर प्रथम आली. कारंजा तालुयात प्रथम येण्याचा मान उंबर्डा केंद्रांतर्गत जिल्हा परिषद शाळा सुकळीच्या विद्यार्थिनी श्रावणी मंगेश चौधरीने प्राप्त केला. २३ एप्रिल रोजी होणार्‍या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी ती पात्र ठरली. shrawani chaudhary तिच्या या नेत्रदीपक यशाबद्दल कारंजा पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी श्रीकांत माने, शिक्षण विस्तार अधिकारी अशोक उपाध्ये, उंबर्डा बाजार केंद्राचे केंद्र प्रमुख जाकीर शेख, मुख्याध्यापक ललित राऊत , शिक्षक नंदकिशोर भोयर, शिक्षक अशोक मुळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रशांत चौधरी, सरपंच सविता सुनील वानखडे तसेच शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत सुकळी यांनी तिचे अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.