देशविरोधी कारवायांतील स्लीपर सेल उद्ध्वस्त

जैसलमेरमध्ये एकाला अटक

    दिनांक :18-Apr-2026
Total Views |
जैसलमेर,
sleeper cell उत्तरप्रदेशातील बिजनौर येथे उघडकीस आलेल्या जाळपोळ आणि देशविरोधी कारवायांच्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यातील नाचाना परिसरातून राजुराम गोदारा नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली. तो दूरवरून कारवायांचे संचालन करत या संपूर्ण नेटवर्कमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत होता, असे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले.
 

sleeper cell module busted India 
हे प्रकरण केवळ स्थानिक पातळीपुरते मर्यादित नसून, एका मोठ्या संघटित नेटवर्कचा भाग आहे. 24 मार्चच्या रात्री भारत-पाकिस्तान सीमेजवळील भारवाला परिसरात संशयास्पद हालचाली आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी कारवाई केली. याचवेळी राजुराम गोदाराला ताब्यात घेण्यात आले. दुसèया दिवशी 25 मार्चला विविध यंत्रणांनी एकत्रितपणे त्याची चौकशी केली. तपासादरम्यान असे उघड झाले की, तो टेलिग्राम प्लॅटफॉर्मद्वारे संपूर्ण नेटवर्क नियंत्रित करत होता आणि उत्तरप्रदेशात सक्रिय असलेल्या तरुणांना सूचना देत होता.
टोपण नावाचा वापर
उत्तरप्रदेशचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) अमिताभ यश यांनी सांगितले की, प्राथमिक चौकशीदरम्यान आरोपीने आपली ओळख लपवण्यासाठी आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी सय्यद या टोपण नावाचा वापर केला. तथापि, सातत्यपूर्ण आणि तांत्रिक चौकशीनंतर त्याची खरी ओळख उघड झाली. तो राजुराम गोदारा असल्याचे निश्चित झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. या खुलास्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी सीमावर्ती भागात दक्षता वाढवली आहे.