डॉ. देवराव होळी यांची माहिती
यवतमाळ,
Social welfare of tribals आदिवासी समाजहित व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त जनजाती गौरव दिवस राबविण्यात येत आहे. १५ नोव्हेंबर रोजी होणार्या या कार्यक‘माच्या पृष्ठभूमीवर भारतीय जनता पार्टी आदिवासी मोर्चा महाराष्ट्र राज्याच्या वतीने वर्षभर पंचपरिवर्तन सूत्र राबविण्यात येणार असल्याची माहिती अनुसूचित जाती मोर्चा प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी शनिवार, १८ एप्रिल रोजी दिली.
यानिमित्त झालेल्या पत्रपरिषदेत आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके, मुंबईचे आमदार योगेश सागर, भाजपा पुसद जिल्हाध्यक्ष डॉ. आरती फुपाटे, अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष दिलीप मरांडे, नरेश गेडाम, आकाश मडावी व राजू पडगिलवार यांची उपस्थिती होती. आदिवासींच्या ४५ जमाती सक्षम, सबळ व समर्थ करण्यासाठी कुटुंब प्रबोधन, पर्यावरण, समरसता, नागरी कर्तव्य व स्व-जागृती ही पंच परिवर्तन सूत्रे समाजात रुजवण्यात येणार आहेत.
या अंतर्गत शाश्वत कुटुंबव्यवस्था निर्माण करणे, व्यक्तिगतपासून सामाजिक पातळीपर्यंत पर्यावरण रक्षण आणि संवर्धन, परस्परपूरक व स्नेहमय सामाजिक संबंध जोपासणे, देशभक्ती बरोबर सामाजिक व नैतिक मूल्यांचा अंगीकार करणे व स्व-जागृती, स्व-भाषा, स्व-संस्कृती, स्व-देशी, स्वतःच्या परंपरा स्वीकारून त्यांना करणे यासाठी भाजपा आदिवासी मोर्चाच्या माध्यमातून पुढाकार घेणार असल्याचे डॉ. देवराव होळी यांनी सांगितले.
विविध योजना सुरू : डॉ. अशोक उईके
Social welfare of tribals यावेळी आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी आश्रमशाळेत शिकणारे विद्यार्थी व आदिवासी महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना सुरू करण्यात आल्याचे सांगितले. यासाठी उमेदच्या धर्तीवर राणी दुर्गावती महिला सबलीकरण योजना राबवण्यात येत असल्याचे ते म्हणाले. या अंतर्गत राज्यात ५०० महिला बचतगट सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. यासोबतच सुरू होणार्या नवीन शैक्षणिक वर्षात आश्रमशाळेतील सर्व विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी गणवेश, पुस्तके व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध झालेले असेल अशी ग्वाही डॉ. अशोक उईके यांनी दिली.