कुरखेडा,
solar agricultural pump consumer कुरखेडा येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वित्तरण कंपनीच्या वतीने शासनाच्या ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेअंतर्गत बसविण्यात आलेल्या सौर कृषी पंपांबाबत ग्राहक तक्रार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात अनेक शेतकर्यांनी आपल्या तक्रारी नोंदवल्या आहेत.
यावेळी महावितरण कंपनीच्या वतीने संबंधित कंपन्यांशी संपर्क साधून तक्रार निवारणासाठी सहकार्य करण्यात आले. कार्यक्रमास महावितरणचे उपकार्यकारी अभियंता मिथीन मुरकुटे, बांबोळे यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य चांगदेव फाये यांनी भेट देऊन सविस्तर माहिती घेतली. यावेळी विनोद नागपूरकर, कढोली येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष गंगाधर लोनबले व अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते. शेतकर्यांनी सौर कृषी पंपांच्या दुरुस्ती संदर्भात महत्त्वाची मागणी केली. सध्या पंपांमध्ये बिघाड झाल्यास दुरुस्तीसाठी मोठा विलंब होतो. त्यामुळे कुरखेडा तालुका स्तरावर सर्विस सेंटर सुरू करणे अत्यावश्यक आहे.solar agricultural pump consumer जर स्थानिक स्तरावर सेवा केंद्र उपलब्ध झाले, तर पंपांची दुरुस्ती लवकर होऊन शेतीसाठी पाण्याची अडचण कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. यासाठी तालुका स्तरावर सर्विस सेंटर सुरू करण्याची मागणी चांगदेव फाये तसेच शेतकरी बांधवांनी केली आहे.