नागपूर,
Sri Badrinath Temple सेंट्रल एव्हेन्यू रोड, दोसर भवन चौक, लोहारपुरा येथील मध्य भारतातील प्राचीन श्री बद्रीनाथ मंदिराचे पट अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर, रविवार दि. १९ एप्रिलला सकाळी ७.०५ वाजता उघडण्यात येणार आहेत.
या पावन सोहळ्यास आमदार प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, मोहन मते, संदीप जोशी, भाजपा शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी, माजी आमदार गिरीश व्यास, Sri Badrinath Temple विकास कुंभारे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.पहिले दर्शन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष जयप्रकाश गुप्ता यांच्या हस्ते होणार असून, धर्मध्वज पूजन पुनीत रामकृष्ण पोद्दार करतील. मुख्य पुजारी पं. उमेश तिवारी यांच्या हस्ते अभिषेक व पूजा होऊन प्रसाद वाटप करण्यात येईल.मंदिर ट्रस्टने भाविकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
सौजन्य : ब्रजभूषण शुक्ला,संपर्क मित्र