शिवाजीनगरच्या वळणांवर ‘खड्ड्यांचा सापळा’ – नागरिक त्रस्त

    दिनांक :18-Apr-2026
Total Views |
नागपूर,
Substandard roads रामनगर चौकातून लक्ष्मी भुवन चौकाकडे जाताना उजव्या हाताला शिवाजीनगरकडे वळणारे तीन रस्ते सध्या नागरिकांसाठी धोक्याचे ठिकाण ठरत आहेत. हॉटेल बॅरलमार्गे वझलवार ड्रायव्हिंग स्कूलकडे जाणारा रस्ता, श्रीराम फायनान्सच्या गल्लीतून बास्केटबॉल ग्राउंडकडे जाणारा मार्ग आणि फळ मार्केटमधून पुरुषोत्तम सुपर बाजारकडे जाणारा रस्ता—या तिन्ही ठिकाणी रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याचे चित्र दिसते.

nitin 
 
 
संध्याकाळी या मार्गावर प्रचंड वाहतूक असताना दुचाकीस्वार या गल्ल्यांचा वापर करतात, मात्र वळण घेताच खड्ड्यांचा सापळा त्यांची वाट पाहत असतो.Substandard roads  पेवर ब्लॉक आणि डांबरीकरण यामधील असमतोलामुळे रस्ते उखडले असून, वाहन चालवणे धोकादायक बनले आहे.विशेषतः पादचारी, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि गरोदर महिलांसाठी हे वळण जीवघेणे ठरत आहेत. अनेकांना किरकोळ अपघातांचा सामना करावा लागत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.तातडीने दुरुस्ती न झाल्यास मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात असून, प्रशासनाने या ‘खड्ड्यांच्या सापळ्या’कडे त्वरित लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे.
सौजन्य :नितीन दाते,संपर्क मित्र