नागपूर,
Bachchraj Vyas School पंडित बच्छराज व्यास इंग्रजी माध्यम शाळेत उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर बालरंजन संस्कार वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. सुट्ट्यांमध्ये मुलांना मोबाईल व टीव्हीपासून दूर ठेवून त्यांचा सर्वांगीण विकास घडवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. हे शिबिर २१ एप्रिल ते २ मे दरम्यान दररोज सकाळी ७ ते ११ या वेळेत आयोजित करण्यात येणार आहे. शिबिरात चित्रकला, हस्तकला, सूर्यनमस्कार, स्तोत्र-गायन तसेच पारंपरिक भारतीय खेळांचा समावेश आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शिबिर शुल्क १०० रुपये असून, इतर शाळांतील विद्यार्थ्यांसाठी २०० रुपये ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, १ मे रोजी ‘आनंद मेळावा’ आयोजित करण्यात येणार असून, Bachchraj Vyas School यात फक्त शिबिरात सहभागी विद्यार्थीच भाग घेऊ शकतील. या संस्कार वर्गात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक अनिरुद्ध टेंभेकर यांनी केले आहे.
सौजन्य: रोहिणी जोशी, संपर्क मित्र