मंदिरातील दानपेटी फोडणारे चोरटे जाळ्यात

    दिनांक :18-Apr-2026
Total Views |
वर्धा
Thieves caught Wardha सेलू आणि रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मंदिरातील दानपेटी फोडणार्‍या ३ चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने नागपूर येथून अटक केली. त्यांच्याकडून रोख, मोबाईल, दुचाकी असा ४ लाख ८१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
 
arrest 
Thieves caught Wardha आकाश म्हैसकर (३२) रा. टाकळी यांनी केळझर येथील बुद्धविहारातील दानपेटी फोडून २० हजार रुपये चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार दिली होती. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत असताना घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरटे मानेवाडा, नागपूर येथील असल्याची माहिती मिळाली. Thieves caught Wardha पथकाने शोध घेऊन अनिकेत जुगनाके (२१) रा. द्वारकापुरी नागपूर, अमित सहरीया (२२) रा. पारडी, नागपूर, पृथ्वी उर्फ विजय हत्तीमारे (२०) रा. मानेवाडा, नागपूर यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. तसेच रामनगर हद्दीत येणार्‍या नागठाणा रोड येथील हनुमान मंदिरातील दान पेटी फोडल्याचीसुद्धा कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून रोख, ४ मोबाईल, दुचाकी असा ४ लाख ८१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.