आदिवासी हलबा-हलबी संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी घासले

    दिनांक :18-Apr-2026
Total Views |
गोरेगावात आदिवासी हलबा-हलबी संघटनेची कार्यकारिणी गठित

गोरेगाव, 
Tribal Halba-Halbi Organization येथील आदिवासी हलबा-हलबी समाज संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी पिंडकेपार येथील उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ता भरतराम घासले यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय कार्यालय कंटगी अंतर्गत १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमीत्त घेण्यात आलेल्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला.
 
 
ghasale
  
Tribal Halba-Halbi Organization  बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे केंद्रीय सचिव अजय कोठेवार होते. यावेळी मार्गदर्शक म्हणून राज्याध्यक्ष वाय. सी. भोयर, नगराध्यक्ष तेजराम बिसेन, कृषी अधिकारी महेंद्र दिहारे मंचावर उपस्थित होते. प्रसंगी संघटनेची गोरेगाव तालुका कार्यकारीणी गठीत करण्यात आली. ज्यामध्ये सर्वानुमते भरतराम घासले यांची अध्यक्ष पदी तर युवक अध्यक्षपदी नितेश येल्ले, महिला कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी संगीता नाईक, तर कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी शंकर राऊत यांची निवड करण्यात आली. तसेच तालुका सचिवपदी स्नेहल कोठेवार, युवक सचिवपदी निलेश राऊत, महिला सचिवपदी संगीता घासले, तर कर्मचारी संघटनेच्या सचिवपदी देवेंद्र भोयर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन संघटनेचे सचिव शिवानंद फरदे यांनी केले. यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.