अट्टल दुचाकी चोरटा स्थानिक गुन्हे शाखाच्या जाळ्यात

    दिनांक :18-Apr-2026
Total Views |
५० हजाराची चोरीची दुचाकी जप्त

गोंदिया, 
two-wheeler thief शहरातील रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरी करणार्‍या अट्टल चोरट्याला स्थानिक गृन्हे शाखाच्या पथकाने ताब्यात घेत त्यांच्याकडून ५० हजार रुपये किमतीची दुचाकी जप्त केली आहे. ही कारवाई १७ एप्रिल रोजी करण्यात आली. गौरव उर्फ सलमान नरेश शर्मा (२७) रा. यादव चौक, गोंदिया असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.
 
 
two-wheeler thief
 
two-wheeler thief  स्थानिक गुन्हे शाखाचे पोलिस पथक पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनात रामनगर व शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास व गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना सिविल लाईन परिसरात लोकोशेडजवळ आरोपी गौरव उर्फ सलमान हा संशयितरित्या दिसून आला. यावेळी पथकाने त्यास ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्याने आपले नाव गौरव उर्फ सलमान नरेश शर्मा (२७) रा. यादव चौक, गोंदिया असे सांगितले. यावेळी त्याच्या जवळील दुचाकीबाबत सखोल विचारपूस केल्यावर सदरची दुचाकी रामनगर परिसरातून चोरी केल्याचे त्याने कबुल केले. यावर पोलिसांनी त्याच्या ताब्यातील दुचाकी किमत ५० हजार रुपये जप्त करून गुन्हे अभिलेख तपासण्यात आले. ज्यामध्ये सदर दुचाकी चोरीबाबत रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, आरोपीला मुद्देमालासह रामनगर पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले असून पुढील कारवाई रामनगर पोलिस करीत आहे.