दिंडाळा शाळेत शिक्षकांचा छळ व भ्रष्टाचाराचा आरोप

    दिनांक :18-Apr-2026
Total Views |
चौकशीवर प्रश्नचिन्ह, प्रशासन मौनात

उमरखेड, 
Umarkhed: Zilla Parishad Higher Primary दिडाला येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक येथे मुख्याध्यापक व काही शिक्षकांकडून विशिष्ट शिक्षकांचा छळ होत असल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. या संदर्भात प्रशासनाकडे तक्रारी देऊनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. तक्रारकर्त्या शिक्षकांच्या म्हणण्यानुसार, मुख्याध्यापक सिद्धार्थ दवने व इतर संबंधित शिक्षकांकडून मानसिक त्रास, दडपण व विविध प्रकारे छळ केला जात आहे. नावाखाली केवळ थातुरमातुर कारवाई होत असून तक्रारकर्त्यांवरच दबाव आणला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
 
 
school
 
मुख्याध्यापकांच्या आर्थिक व प्रशासकीय गैरव्यवहारांवर पडदा टाकण्यासाठी काही शिक्षक व संबंधित अधिकार्‍यांकडून प्रयत्न होत असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे. तक्रार मागे घेण्यासाठी साम, दाम, दंड, भेद या मार्गांचा वापर करून दबाव आणला जात असल्याचेही जाते. याशिवाय, भ्रष्टाचाराला साथ न देणार्‍या शिक्षकांना सक्तीने रजेवर पाठवणे, पगार रोखणे, महिलांच्या कायद्यांचा गैरवापर करण्याची धमकी देणे, तसेच बदलीसाठी दबाव टाकणे असे प्रकार घडत असल्याचे आरोप आहेत. पूर्वीही २ जानेवारी २०१६ रोजी एका शिक्षकावर विद्यार्थ्यांसमोर हल्ला झाल्याचा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत असून, अशा घटनांमुळे शाळेतील वातावरण बिघडल्याची चर्चा सध्या आणखी एका शिक्षकावरही अशाच प्रकारचा दबाव टाकला जात असल्याची माहिती आहे.
 
  
Umarkhed: Zilla Parishad Higher Primary  तक्रारकर्त्यांना गावातील काही व्यक्तींकडून धमक्या मिळत असल्याचेही समोर आले असून त्यांच्या जीवितास धोका असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. शाळेतील अनुचित प्रकारांचे सीसीटीव्ही पुरावे नष्ट केल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. माहिती अधिकारांतर्गत मागितलेली माहितीही मिळत नसल्याची आहे. दरम्यान, याच तालुक्यातील दुसर्‍या शाळेतील मुख्याध्यापकावर भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची घटना घडली असताना, दिंडाळा प्रकरणात मात्र कारवाई होत नसल्याने संबंधित अधिकार्‍यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणावे, अशी मागणी स्थानिक नागरिक व शिक्षकांकडून होत आहे.
चौकशी सुरू : गटशिक्षण अधिकारी
या संदर्भात गटशिक्षण अधिकारी विजय बेतेवाड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, या संदर्भात चौकशी समिती नेमण्यात आली असून अद्याप चौकशी समितीचा अहवाल आलेला नाही.