पुन्हा उन-पावसाचा खेळ, बळीराजाच्या संकटाची वेळ!

राज्यात दाटले अवकाळीचे ढग तब्बल २२ जिल्ह्यांना बसणार तडाखा

    दिनांक :18-Apr-2026
Total Views |
मुंबई
Maharashtra unseasonal rain ऐन उन्हाळ्यात महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळी पावसाचे संकट घोंगावत आहे. १९ , २० आणि २१ एप्रिल रोजी राज्यात वादळी वाèयासह अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
 
rain 
यामुळे उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे. मात्र, काढणीला आलेल्या शेती पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. Maharashtra unseasonal rain १९  एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट—ातील पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूरला अवकाळी पावसाचा यलो अलर्ट असेल. तसेच मराठवाड्यात, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशीवला अवकाळी पावसाचा यलो अलर्ट असेल. यावेळी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहतील. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी.
Maharashtra unseasonal rain २० आणि २१ एप्रिल रोजी कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वाग़यासह अवकाळी पाऊस पडेल. या विभागातील २२ जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. यावेळी विजांचा कडकडाट पाहायला मिळेल. महाराष्ट्रातील बहुतांश भागात उष्णतेची लाट कायम असतांना पुन्हा अवकाळी पाऊस सक्रिय होत आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
Maharashtra unseasonal rain दरम्यान, अवकाळी पावसाच्या पृष्ठभूमीवर कृषी विभागाकडून शेतकèयांना आवाहन करण्यात आले आहे. शेतकèयांनी शेतीची कामे हवामानानुसार नियोजित करावीत. काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवावीत किंवा ताडपत्री/झाकणाने सुरक्षित ठेवावीत.वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीट यापासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. शेतमाल, भाजीपाला आणि इतर काढणी केलेले उत्पादन मोकळ्यावर ठेवू नये.