महिलेचे दगडाने डोके फोडले

    दिनांक :18-Apr-2026
Total Views |
चौघांविरुद्ध गुन्हे दाखल

उमरखेड, 
Women's disputes घरासमोर येऊन शिवीगाळ का करता, असे विचारल्यावर शेजारी राहणार्‍या दोघा भावांनी वाद घालून महिलेच्या कानशिलात चापट मारली व कपाळावर दगड मारून जखमी केले. तसेच महिलांनी केस ओढून मारहाण केली, अशा सुनीता पवार यांच्या तक्रारीवरून उमरखेड पोलिसांनी चौघांवर गुन्हे दाखल केले आहेत.
 
 
fir
 
Women's disputes  माहितीनुसार, शुक‘वार, १७ एप्रिलला रात्री ८.३० च्या सुमारास सुनीता पवार यांच्या घरासमोर उभे राहून दारू पिऊन शिवीगाळ करणारे अशोक जाधव व त्याचा भाऊ किशोर यांना विनाकारण शिवीगाळ का करता, असे सुनीता यांनी घराबाहेर येऊन विचारले असता किशोरने वाद घालणे सुरू केले. तेव्हा अशोकने सुनीता यांना चापट मारून दगड कपाळावर जखमी केले. तुमच्या घरातील सर्वांनाच खतम करतो, अशीही धमकी दिली. तेव्हा अशोकची पत्नी ज्योत्स्ना व आई पार्वती या दोघींनी शिवीगाळ करीत केस ओढून मारहाण केली, अशा तक्रारीवरून उमरखेड पोलिसांनी अशोक जाधव, किशोर जाधव, ज्योत्स्ना जाधव व पार्वती जाधव या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.