नागपूर, Women's Kala Niketan महिला कला निकेतनतर्फे अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर आयोजित अंकुर वाळवण बाजाराला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शन व विक्रीत महिला उद्योजिकांनी तयार केलेले पापड, कुरडया, सांडगे, सरबते, लोणची तसेच इतर गृहोपयोगी वस्तू उपलब्ध करून दिल्या.
दर्जेदार व वाजवी दरातील वस्तूंमुळे ग्राहक समाधानी होते.Women's Kala Niketan हा उपक्रम महिला उद्योजिकांना प्रोत्साहन देणारा ठरत असल्याचे सहभागी महिलांनी सांगितले.यापुढेही विविध सणांपूर्वी असे बाजार आयोजित केले जाणार असल्याची माहिती आयोजिका सुनीता मुंजे यांनी दिली.
सौजन्य: सुफला ताटके,संपर्क मित्र