दारूच्या नियमित सेवनाने हळूहळू ‘लिव्हर’ धोक्यात
व्यसनमुक्ती तज्ञ डॉ. श्रीकांत मेश्राम यांची जनजागृती
यवतमाळ,
‘World Liver Day’ दारूच्या नियमित सेवनामुळे हळूहळू (लिव्हर) कमजोर होत जाते हे व्यसन असेच सुरू ठेवले तर यकृताशी संबंधित गंभीर आजार जडण्याची शक्यता वेगाने वाढते, तेव्हा या व्यसनापासून स्वतःला दूर ठेवा किंवा दूर व्हा, असे आवाहन मानसोपचार तथा व्यसनमुक्ती तज्ञ डॉ. श्रीकांत मेश्राम यांनी केले. १९ एप्रिलला जगभरात साजर्या होणार्या ‘वर्ल्ड लिव्हर डे’च्या पार्श्वभूमीवर ते बोलत यकृताचे आयुर्मान जास्त आहे तरीीमम बदललेली जीवनशैली, दारूचे व्यसन, व्यायामाचा अभाव तसेच पाश्चात्य खाद्यपदार्थांच्या आहारी गेल्यामुळे यकृताचे आरोग्य बिघडते आहे. म्हणून यकृताच्या आरोग्यासाठी डॉ. मेश्राम यांनी संबंधित आजार व त्यावरील उपायांची माहिती दिली.
दारूच्या व्यसनामुळे सुरुवातीच्या टप्प्यात थकवा, भूक न लागणे, पोट फुगणे, पिवळेपणा अशी लक्षणे दिसतात. अनेकदा ही दुर्लक्षित केली जातात. त्यामुळे ‘फॅटी लिव्हर’ म्हणजेच यकृतात चरबी साठू लागते. म्हणूनच यकृत निरोगी ठेवण्यासाठी योग्य आहार, विहार, शिस्तबद्ध दिनचर्या अत्यंत आवश्यक आहे. आहारात ताज्या भाज्या, फळे, प्रथिनयुक्त पदार्थ, भरपूर पाणी यांचा समावेश असावा. तेलकट, तळलेले आणि प्रकि‘या केलेले पदार्थ टाळावे. दारूचे सेवन पूर्णपणे टाळणे किंवा मर्यादित ठेवणे ही महत्त्वाची बाब असल्याचे ते म्हणाले.
‘World Liver Day’ नियमित व्यायाम, योग आणि प्राणायामामुळे शरीरातील चरबी नियंत्रणात राहते आणि यकृताचे कार्य सुरळीत चालते. पुरेशी झोप, वेळेवर जेवण आणि ताणतणाव कमी ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य यांचा परस्पर संबंध आहे. तणावमुक्त जीवनशैली यकृताच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरते. यकृताचे आजार सुरुवातीला लक्षणे दाखवता वाढतात, त्यामुळे वेळोवेळी यकृताची तपासणी करणे आणि जीवनशैलीत योग्य बदल करणे गरजेचे आहे. म्हणूनच आजच्या दिवशी प्रत्येकाने आपल्या आरोग्याची जबाबदारी स्वीकारून निरोगी सवयी अंगिकाराव्या, असे आवाहनही त्यांनी केले.