-सरसंघचालकांची उपस्थिती
- यशवंतराव केळकर जन्मशताब्दी
-अभाविपचे आयोजन
नागपूर,
Yashwantrao Kelkar janmshtabdi ज्येष्ठ प्रचारक प्रा. यशवंतराव केळकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने अ. भा. विद्यार्थी परिषदेतर्फे शनिवारी २५ एप्रिलरोजी ‘प्रिय यशवंतराव’ हा अभिवाचन कार्यक्रम व स्थायी कार्यकर्ता एकत्रिकरण होणार आहे. डॉ. सुरेश भट सभागृहात सायंकाळी वाजता आयोजित या कार्यक्रमाला रा.स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत तसेच अभाविपचे राष्ट्रीय संघटक आशीष चौहान प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी समस्त कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.