मानोरा तालुक्यात जिल्हा परिषद शिक्षकांची वाणवा

वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

    दिनांक :18-Apr-2026
Total Views |
मानोरा,
zilla parishad teachers तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली असून शिक्षकांच्या कमतरतेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य अंधारात सापडले आहे. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या माजी पं. स. सदस्या छाया मनोहर राठोड यांनी शिक्षण विभागाला आंदोलनाचा इशारा दिला आहे.
 
 

zilla parishad teachers 
 
 
तालुयातील तब्बल पाच शाळा सध्या पूर्णवेळ शिक्षकांविना असून, १२ शाळा केवळ एका शिक्षकाच्या भरोशावर सुरू आहेत. विशेषतः हळदा, अभईखेडा, रोहणा आणि हातना येथील शाळांमध्ये एकही शिक्षक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, तर अजनी, सोमेश्वर नगर, गोवर्धन नगर आणि बोराव्हा यासारख्या अनेक गावात एकाच शिक्षकाला सर्व इयत्तांचे वर्ग सांभाळावे लागत आहेत. सध्या तालुयात एकूण ७१ शिक्षकांची पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकीकडे पदांची कमतरता असतानाच, दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या अनेक मूळ शिक्षकांना केंद्रप्रमुख किंवा इतर प्रशासकीय पदांचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला आहे. यामुळे शाळांमधील प्रत्यक्ष अध्यापन कार्य ठप्प झाले आहे. अतिरिक्त प्रभार असलेल्या शिक्षकांना तात्काळ मूळ शाळेत परत पाठवण्यात यावे आणि ज्या शाळांमध्ये शिक्षक अतिरिक्त आहेत, त्यांचे रिक्त पदे असलेल्या शाळांमध्ये तातडीने समायोजन करण्यात यावे.zilla parishad teachers जर शिक्षण विभागाने यावर त्वरित पावले उचलली नाहीत आणि प्रत्येक शाळेला किमान आवश्यक शिक्षक नियुक्त केले नाहीत तर मानोरा पंचायत समितीमध्ये विद्यार्थ्यांना घेऊनच शाळा भरवण्यात येईल, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. पालकांमध्येही या परिस्थितीबाबत मोठा संताप असून मुलांच्या शिक्षणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.