सेव्हन नोट्सने मराठी गीतांची घडवली ‘स्वर यात्रा’

    दिनांक :19-Apr-2026
Total Views |
नागपूर :
निसर्गात वसंत ऋतू बहरला असतानाच मराठी जुन्या-नव्या मराठी गीतांची स्वरयात्रा घडवून गायक कलाकारांनी रसिकांच्याही हृदयी वसंत सेव्हन नोट्स संस्थेद्वारे 'Swar Yatra' ’स्वर यात्रा’ या कार्यक्रमाचे सभागृहात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातून मराठी गीतांचा सुरेल प्रवास उलगडत गेला. नुकत्याच स्वर्गवासी झालेल्या महाराष्ट्राच्या लाडक्या गायिका आशा भोसले यांना ‘हृदयी प्रीत जागते’, ’धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना ’, ‘रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना’, ‘शारद सुंदर चंदेरी ’येऊ कशी प्रिया’, ’धुंदीत राहू मस्तीत गाऊ’, अजरामर गीते गाऊन स्वरांजली अर्पण करण्यात आली.
 
 
swar
 
'Swar Yatra'  आभाळमाया, वादळवाट, अवघाची हा संसार, माझा होशील ना.... या मालिकांच्या शीर्षक गीतांनी कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. धुंद एकांत हा , शुक्रतारा मंद वारा,आताच बया का बावरला, मला वेड लागले प्रेमाचे,जीव रंगला दंगला, मेंदीच्या पानावर, अश्विनी ना, हिरवा निसर्ग संधीकाली.. या अशा, या एकूण ३० नव्या जुन्या गायकांनी ताकदीने सादर केलीत. उडत्या चालीच्या गीतांनी मैफिलीत रंग भरत रसिकांची दाद मिळवत ‘वन्स मोअर’ घेतले. डॉ सुधीर कुन्नावार, अर्चना उचके, आरती भालेराव, मुकुल पांडे, पद्मजा सिन्हा यांनी गीत गायले. सुजाता पटवर्धन यांनी निवेदनातूनही गीतांच्या मूळ गायक,गायिका, गीतकार, संगीतकार आणि निर्मिती याबाबतची माहिती व किस्से सांगत रसिकांना खिळवून ठेवले.