पोलिसांची तातडीने कारवाई
अमरावती,
Abuse of an elderly woman एका वयोवृद्ध महिलेवर अत्याचार करून पैसे घेऊन पसार आरोपीला अवघ्या १२ तासांच्या आत शिरजगाव कसबा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. आवेज खान युनूस खान (वय २२ वर्षे, रा. मिल्लतनगर, कांडली परतवाडा, ता.अचलपूर) असे आरोपीचे नाव आहे. १८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान म. प्र. येथील एका गावातून परतवाडा येथे उपचाराकरीता पायी जात असलेल्या ६५ वर्षीय वृद्ध महिलेस उपरोक्त आरोपीने मी पण परतवाडा येथे जात आहे. चला मी तुम्हाला माझ्या गाडीवर सोडतो असे म्हणून गाडीवर बसवले. रस्त्यातच खरपी शिवारातल्या एका पांदण रस्त्यावर गाठी थांबविली. वृद्ध महिलेस मला इकडे एक काम आहे चला आपण तिकडे जाऊ, माझे काम करून पढे परतवाड्याला जाऊ असे म्हणून महिलेस आतमध्ये नेले.
Abuse of an elderly woman तिथे कोणीही नसल्याचा फायदा घेत त्याने वृध्द महिलेशी बळजबरीने वारंवार संभोग केला व सदरील महिलेकडील तिच्या उपचाराकरीता असलेले ६०० रुपये बळजबरीने काढून घेतले. या घटनेदरम्यान पीडित महिलेस गंभीर दुखापत आरोपीताने केली. सदर महिलेवर अचलपूर येथे उपचार सुरू आहे. १९ एप्रिलला दुपारी त्यांच्या तक्रारीवरून ठाणे शिरजगाव येथे गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी तीन तपास पथके तयार करून तांत्रिक तपास केला. गुन्ह्यातील आरोपीताने पीडित महिलेस स्वतःचे दुचाकीवर ज्या मार्गाने नेले त्या मार्गावरील सर्व सि.सि.टी.व्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. तांत्रीक विश्लेषण करून आरोपीची ओळख पटविण्यात आली. लगेच त्याला ताब्यात घेण्यात आले. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याचेवर यापूर्वी पो.स्टे.परतवाडा येथे चोरी, जबरी चोरी सारख्या गुन्ह्याची नोंद आहे. ही कारवाई स.पो.नि. अमन सिरसाट, यांचे नेतृत्वात पोउपनि प्रशांत जाधव, पोउपनि सतीश पुनसे, सपोउपनि सोनवणे, भारत कोहाळे, मिलिंद इंगोले, मनोज पंडीत, नंदराम पटोरकर, राधिका उघडे, वैभव मांडवगणे यांनी केली.