मेट्राे उड्डाणपुलावर टाटा एस वाहन खांबावर धडकले

    दिनांक :19-Apr-2026
Total Views |
- सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

अनिल कांबळे
नागपूर, 
Accident on metro flyover कामठी-नागपूर मार्गावरील नारी राेड मेट्राे स्थानकासमाेरील उड्डाणपुलावर रविवारी पहाटे झालेल्या अपघाताने सुरक्षा व्यवस्थेची पाेलखाेल केली. भरधाव वेगातील टाटा एस (एमएच 40-सीटी-6211) वाहन उड्डाणपुलावरील विद्युत खांबावर आदळल्याने वाहनाचा पुढील भाग पूर्णतः चक्काचूर झाला. या अपघातात टाटा वाहनातील संताेष गावकर (55, रा. नवा गाेदाम, कामठी) जखमी झाले.
 
 
apgatkkkk
 
Accident on metro flyover  मिळालेल्या माहितीनुसार, टाटा एस वाहन कामठीहून पिवळी नदीमार्गे एलआयसी चाैकाकडे जात हाेते. नारी मेट्राे स्थानकासमाेरील उड्डाणपुलावर पाेहाेचताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि खांबावर जाेरदार धडकले. अपघातानंतर वाहन उड्डाणपुलावर आडवे उभे राहिल्याने बस व इतर वाहनांची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. घटनेची माहिती मिळताच पांचपावली पाेलिस ठाण्याचे पाेलिस निरीक्षकानी बीट मार्शलला घटनास्थळी पाठवले. त्यानंतर पाेलिस पथक तैनात करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या उड्डाणपुलाच्या उद्घाटनानंतर यापूर्वीही ऑटाेमाेटिव्ह चाैकाजवळून एक वाहन खाली काेसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला हाेता. सतत घडणारे अपघात या उड्डाणपुलाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करत आहेत. या उड्डाणपुलाच्या सुरक्षिततेसाठी ठाेस उपाययाेजना कधी करणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.