खरांगणा (मो.),
Accident on Wardha-Arvi road रस्ता ओलांडत असलेल्या अस्वलीचा भरधाव वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाला. ही घटना वर्धा-आर्वी मार्गावरील तळेगाव (रघुजी) शिवारात आज रविवार १९ रोजी पहाटे घडली. पाण्याच्या शोधात रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने समृद्धी महामार्गावर बिबट ठार झाला. ४ रोजी उघडकीस आलेली ही घटना ताजी असताना आता तळेगाव रघुजी परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत अस्वल ठार झाली. परिणामी जंगलातच वन्यप्राण्यांना पाणी मिळावे यासाठी वनविभागाने विशेष दक्षता घेण्याची गरज वन्यजीव प्रेमींकडून व्यत केली जात आहे.
Accident on Wardha-Arvi road अस्वल ठार झाल्याची माहिती मिळताच खरांगणा (मो.) चे वनपरिक्षेत्र अधिकारी नरेंद्र सावंत व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळ गाठले. प्रादेशिक वनविभागाच्या अधिकार्यांसह कर्मचार्यांनी अस्वलीचा मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला. त्यानंतर अस्वलीचा मृतदेह क्षेत्र सहाय्यक अवधुत डेहनकर, वनरक्षक आशिष राठोड, विशाल घुगे, अभिजित भुरे, शुभम उपाध्याय, दुर्वा धारणे, भारती गावडे, आशा रिठे, वनमजूर उत्तम आहेर, शंकर शिंदे यांनी खरांगणा येथील नर्सरीत आणला. पशुवैद्यकीय अधिकारी आर. जी. घुमडे यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर उपवनसंरक्षक हरवीर सिंग, सहाय्यक वनसंरक्षक एम. के. आडे यांच्या मार्गदर्शनात अस्वलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली.