हळद, मिरची, मसाले प्रक्रिया उद्योगातून लाखांचे उत्पन्न
बोरगावच्या जयश्री पुनवटकर यांची प्रेरणादायी वाटचाल
यवतमाळ,
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील बोरगाव येथील जयश्री जितेंद्र पुनवटकर यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर अत्यंत कठीण परिस्थितीतून यशाचा मार्ग शोधला आहे. बारावीपर्यंत शिक्षण जयश्री पुनवटकर यांनी 'Advik Gruha Udyog' ‘अद्विक गृहउद्योग’ नावाने ‘हळद प्रकि‘या उद्योग’ उभारून केवळ स्वतःची आर्थिक परिस्थिती सुधारली नाही, तर इतरांसाठीही प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे. जयश्री पुनवटकर यांचे कुटुंब मजूरदार वर्गातील होते. आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी कपडे शिवण्याचे काम सुरू केले होते. परंतु त्यातून महिन्याला केवळ ते ४ हजार रुपये उत्पन्न मिळत होते. हा व्यवसाय स्थिर नव्हता आणि नियमित उत्पन्न नव्हते. त्यामुळे कुटुंबाचा खर्च भागवणे कठीण होत होते.
'Advik Gruha Udyog' कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी काहीतरी नवीन आणि दीर्घकाळ टिकणारा व्यवसाय सुरू करण्याचा त्यांनी निर्धार केला. स्वतःचा उद्योग सुरू करायचा हे त्यांचे ध्येय होते. या प्रवासात कुटुंबियांनी त्यांना दिलीच, पण जिल्हाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील तज्ञांनीही मार्गदर्शन केले. विशेषतः राजहंस आणि हिरोळकर यांच्या प्रशिक्षणामुळे त्यांना योग्य दिशा मिळाली.
पीएमएफएमई योजनेचा लाभ
जयश्री पुनवटकर यांनी आपल्या उद्योगासाठी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रकि‘या उद्योग (पीएमएफएमई) योजनेचा लाभ घेतला. या योजनेत त्यांना २ लाख ८० हजार रुपयांचे अनुदान मिळाले. यासोबतच त्यांनी व मार्गदर्शन घेतले. यामुळे उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक ज्ञान व कौशल्य विकसित झाले. सुरुवातीला त्यांनी ५० किलो मिरची खरेदी करून छोट्या प्रमाणात प्रकि‘या उद्योग सुरू केला. या क्षेत्रातील यापूर्वी कुठलीही माहिती नसल्याने अनेक अडचणी आल्या, परंतु त्यांनी हार मानली नाही. आवश्यक यंत्रसामुग्री व तंत्रज्ञानाचा वापर करत त्यांनी हळूहळू व्यवसाय केला. उच्च प्रतिची मिरची पावडर, मसाला, हळद आणि धणे पावडरची विक्री करून व्यवसाय वाढवला.
यशाची कहाणी
'Advik Gruha Udyog' जयश्री पुनवटकर यांच्या उत्पादनांना बाजारातून चांगला प्रतिसाद मिळू लागला. मागणी वाढली आणि नियमित ऑर्डर मिळू लागल्या. त्यांच्या मेहनतीमुळे आज त्यांची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे बदलली. पूर्वीच्या तुलनेत उत्पन्न दुप्पट-तिप्पट झाले आहे. त्यांनी इतरांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यांच्या यशाची दखल गाव पातळीवर घेतली गेली असून त्यांचा सत्कार करण्यात आला. समाजात त्यांना मान-सन्मान मिळू लागला आहे. आज जयश्री पुनवटकर यांचा व्यवसाय उत्तम सुरू असून त्या सातत्याने प्रगती करत आहेत. बाजारपेठ, प्रदर्शने, पॉम्पलेट व बॅनर यांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या व्यवसायाचा प्रचार-प्रसार सध्या त्यांचे मासिक उत्पन्न ३० ते ४० हजार रुपये असून वार्षिक उत्पन्न लाखोंमध्ये पोहोचले आहे.