वर्धा,
Akshaya Tritiya: Buying Gold साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेला ग्राहकांनी सोने खरेदीलाच पसंती दिली. स्थानिक ढोमणे ज्वेलर्समध्ये सकाळी ग्राहकांनी खरेदीसाठी झुंबड होती. दुपारी उन्ह असल्याने थोडी मोकळीक होती. सायंकाळी उन्ह कमी होताच ग्राहकांनी सोने खरेदीचा मुहूर्त साधला.
धनत्रयोदशी, दसरा आणि अक्षय तृतीयासोबतच गुरू पुष्यामृत मुहूर्तावर नागरिक आपआपल्या परीने सोने-चांदी खरेदी करतात. सोन्याचे भाव आकाशाला भिडले असले तरी मुहूर्तावर आज रविवारी नागरिकांनी सोने खरेदीसाठी गर्दी केली होती. गत वर्षी याच दिवशी सोन्याचा भाव प्रति तोळा ९५ हजार तर चांदी ९७ हजार रुपये किलो होती. यंदा सोन्याचा भाव प्रतितोळा १ लाख ५७ हजार तर चांदीचा भाव २ लाख ५७ हजार रुपये आहे. सोन्या चांदीचे भाव वाढल्यानंतरही नागरिकांचा खरेदीची उत्साह कमी झाला नाही. ज्या ग्राहकांनी आधीच सोने बुक केले होते त्यांनी आज मुहूर्ताच्या दिवशी नेले.
भाववाढीचा सोने खरेदीवर फरक नाही ः ढोमणे
Akshaya Tritiya: Buying Gold मागील वर्षीच्या तुलनेत यंदा अक्षय तृतियेच्या मुहूर्तावर सोन्या चांदीच्या भावात प्रचंड वाढ झाली आहे. चांदीच्या भावात एका वर्षात अडीचपट वाढ झाली आहे, असे असतानाही ग्राहकांची रात्री १० वाजेपर्यंत सोने खरेदीसाठी गर्दी होती. मागीलवर्षीचा आकडा यावर्षीसुद्धा क्रॉस करेल. भाव वाढीचा सोने खरेदीवर कुठलाही फरक पडला नाही, असे ढोमणे ज्वेलर्सचे संचालक सौरभ ढोमणे यांनी सांगितले.