धावपट्टीलगत कोसळले विमान

उत्तर प्रदेशातील घटना, नागपूरची महिला प्रशिक्षणार्थी जखमी

    दिनांक :19-Apr-2026
Total Views |
अलीगड,
plane crash उत्तर प्रदेशच्या अलीगड विमानतळाच्या धावपट्टीलगत शनिवारी एका फ्लाइंग अकॅडमीचे विमान कोसळले. यात महाराष्ट्रातील नागपूर येथील एक महिला प्रशिक्षणार्थी वैमानिक जखमी झाली.
 

Aligarh airport incident, Uttar Pradesh plane crash, flying academy aircraft accident India, trainee pilot injured Nagpur, Cessna 152 crash landing, runway skid accident Aligarh, Dhaniapur airport incident, Pioneer flying academy accident, aviation training accident India, student pilot crash landing, emergency landing failure India, small aircraft accident Uttar Pradesh, runway excursion aircraft India, aircraft skid off runway, civil aviation training accident, India flight training safety, Nagpur woman p 
शनिवारी अलीगढ विमानतळावर एक मोठा अपघात टळला. धावपट्टीच्या मध्यरेषेवरून घसरल्याने एका फ्लाइंग अकादमीचे विमान कोसळले.
 
 
विमान एक महिला plane crash प्रशिक्षणार्थी चालवत होती. विमानतळावर लँडिंग होत असताना धावपट्टीवरून विमान घसरले आणि बाजूला असलेल्या मैदानात कोसळले. वैमानिकाला किरकोळ मार लागला. विमानतळ प्राधिकरणाने घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहे. एका अधिकाèयाने सांगितले की, धानीपूरमधील अलीगढ विमानतळावर चेतक आणि पायनियर या दोन फ्लाइंग अकॅडमी कार्यरत आहेत. त्या वैमानिकांना प्रशिक्षण देतात. देशभरातील विद्यार्थी येथे प्रशिक्षण घेत आहेत. शनिवारी, नेहमीप्रमाणे, पायनियर अकॅडमीचे विद्यार्थी विमाने उडवत होते. सकाळी सुमारे साडेनऊ वाजता, नागपूर येथील एक महिला प्रशिक्षणार्थी सेसना-152 विमान धावपट्टीवर लँडिंग करत असताना, तिचे नियंत्रण सुटले आणि विमान घसरून धावपट्टीलगत कोसळले. या घटनेत महिला प्रशिक्षणार्थी वैमानिक जखमी झाली