पथ्रोट पोलिस ठाण्यावर गर्दी
पथ्रोट,
Arrest of molesters महाराष्ट्रात शाळकरी मुलींच्या छेडखानीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. नुकत्याच परतवाड्यातील लैंगिक शोषणाची घटना समोर असतानाच पथ्रोट पोलिस ठाणे अंतर्गत परसापूर येथे शाळकरी मुलींची छेडखानी करणार्या तीन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. परसापूर येथील अंबापाटी चौकात अनेक दिवसापासून शाळकरी मुलींचा सातत्याने हे तरुण पाठलाग करून छेडखानी करत होते. तरुणांच्या त्रासाला कंटाळून अखेर गावकरी पोलिस ठाण्यावर एकत्र आले व मुलींच्या आई वडिलांनी तक्रार दिली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून संतापाची लाट उसळली आहे. तक्रारीवरून पोलिसांच्या तत्परतेने आकाश प्रभुदास कानतोडे, अर्जुन पांडूरंग जोशी, सुजल राजेश राऊत या २० ते २५ वयोगटातील तरुणांना अटक करण्यात आली.
Arrest of molesters जनता हायस्कूलमध्ये ठोकबर्डा येथील मुली शिक्षणासाठी येतात. पायी ये-जा करीत असल्यामुळे तीन-चार मैत्रिणी एकत्र यायच्या. याच मार्गावर आरोपीचे दुकान आहे. बैठकीचे दुकान असल्यामुळे इथूनच काही दिवसापासून ते तिघे तरुण मुलीचा पाठलाग करायचे. सात एप्रिलपासून या त्रासाची अधिकच वाढ झाली होती. एक दिवस तर ‘आमच्याशी जावळीक साधा’ असे म्हणण्याचे धाडस करून या तरुणांनी हात पकडण्याचा प्रयत्न देखील केला. हा सर्व प्रकार मुलींनी घरी आई-वडिलांना सांगितला. गावात चर्चा झाली. त्यानंतर पन्नास शंभर नागरिकांनी पथ्रोट पोलिस ठाणे गाठले व आरोपींना अटक करण्याची मागणी लावून धरली. घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलिस अधिकारी मनिष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अभय चौथनकर यांनी तातडीने तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्या विरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पोस्को) गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.
(लोगो)