वॉशिंग्टन
Asim Munir अमेरिका आणि इराण यांच्यात मध्यस्थीची भूमिका बजावणारे पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्याबद्दल अमेरिकन गुप्तचर संस्थांनी गंभीर इशारा दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनासाठी मुनीर हे विश्वासघातकी असून ते अमेरिकेच्या हितसंबंधांना बाधा पोहोचवू शकतात, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. मुनीर यांचे इराणच्या उच्च लष्करी अधिकाèयांशी असलेले जुने आणि घनिष्ठ संबंध ही अमेरिकेसाठी धोक्याची घंटा असल्याचे म्हटले आहे.
जनरल मुनीर यांचे इराणच्या कुड्स फोर्सचे दिवंगत कमांडर कासिम सुलेमानी आणि आयआरजीसी प्रमुख हुसेन सलामी यांच्याशी वैयक्तिक आणि व्यावसायिक संबंध आहेत. एकीकडे ट्रम्प मुनीर यांना आपले ‘फेव्हरेट फील्ड मार्शल’ म्हणत असताना, दुसरीकडे गुप्तचर विभागाने मात्र मुनीर यांच्या दुटप्पी भूमिकेमुळे अमेरिकेच्या सुरक्षेला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली आहे.
अहवालात पाकिस्तानचा Asim Munir उल्लेख विश्वासघातकी मित्र असा करण्यात आला आहे. विशेषतः अफगाणिस्तान युद्धाच्या काळात पाकिस्तानने अमेरिकेकडून मदत घेऊन पडद्यामागून तालिबानला साथ दिली होती, याकडे विश्लेषकांनी लक्ष वेधले आहे. ‘फाउंडेशन फॉर डिफेन्स ऑफ डेमोक्रसीज’चे तज्ज्ञ बिल रोजिओ यांच्या मते, पाकिस्तानचा इतिहास पाहता ट्रम्प यांनी सावध राहणे गरजेचे आहे. मुनीर हे ट्रम्प यांच्याशी असलेल्या मैत्रीचा वापर करून छुप्या पद्धतीने इराणचे हितसंबंध जोपासत असल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
पाकिस्तानचे राजकीय विश्लेषक रझा रुमी यांच्या मते, मुनीर यांच्या काळात पाकिस्तानमध्ये नागरी सरकारपेक्षा लष्कराचे वर्चस्व अधिक वाढले आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये मार्गला डायलॉग दरम्यान मुनीर यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर केलेली टीका त्यांची हुकूमशाही प्रवृत्ती दाखवते. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यासह राजकीय विरोधकांवर झालेली कडक कारवाई ही मुनीर यांच्या वाढत्या प्रभावाचाच परिणाम मानली जात आहे.
ट्रम्प यांचा मुनीरवर विश्वास
2025 च्या भारत-पाकिस्तान Asim Munir संघर्षावेळी तणाव कमी करण्यात मुनीर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती, तेव्हापासून ट्रम्प यांचा त्यांच्यावरील विश्वास वाढला आहे. सध्या मुनीर हे ट्रम्प यांचे निकटवर्तीय जारेड कुशनर आणि स्टीव्ह विटकॉफ यांच्यामार्फत इराणशी पडद्याआड चर्चा घडवून आणत आहेत. मात्र, अण्वस्त्र कराराबाबत इराणच्या आडमुठ्या धोरणामुळे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी नुकताच चर्चेतून काढता पाय घेतला. या पार्श्वभूमीवर, मुनीर यांची मध्यस्थी अमेरिकेच्या फायद्याची ठरणार की तोट्याची, याबाबत वॉशिंग्टनमध्ये दोन गट पडले आहेत