शेतकरी संघटनेची मागणी
यवतमाळ,
Ballgard 3 Bt Cotton Seeds बेकायदेशीर बॉलगार्ड ३ बीटी कापसाच्या बियाणे विक‘ीवर निर्बंध घालू नये, अशी मागणी शेतकरी संघटनेचे तंत्रज्ञान व कृषी विस्तार आघाडीप्रमुख मिलिंद दामले यांनी कृषी आयुक्तालयातील निविष्ठा व गुणनियंत्रण कृषी संचालकांकडे केली आहे. महाराष्ट्रातील सर्व कापूस उत्पादक भागातील शेतकर्यांना कृषी केंद्रांमधून बेकायदेशीर बॉलगार्ड ३ हे संकरित बीटी कापसाचे बियाणे विकले जाते. या संकरित बीटी कापसाच्या बॉलगार्ड ३ च्या पाकिटातील बियाण्यात सीआरवाय १ एसी, सीआरवाय २ एसी आणि व्हीआयपी ए ही जनुके आढळतात.
महाराष्ट्र सरकारने शेतकर्यांच्या फायद्यासाठी केंद्र सरकारने काढलेला २४ मे २०२३ चा आदेश केराच्या टोपलीत टाकलेला आहे. या आदेशात बेकायदेशीर बॉलगार्ड ३ उत्पादन व वापराबद्दलचा हा आदेश होता, अशी माहिती संघटनेने दिली आहे. भारतात बीटी कापसाच्या बियाण्यातील व्हीआयपी ३ अ हे जनुक बेकायदेशीर आहे. पण शेतकर्यांसाठी बॉलगार्ड ३ हे बीटी कापसाचे बियाणे व्हीआयपी ३ अ जनुक असल्यामुळेे फायदेशीर आहे. यामुळे कापसावर किडींचा प्रादुर्भाव कमी होतो आणि त्यामुळे कीड नियंत्रण खर्च कमी होतो, असे शेतकरी संघटनेच्या या संदर्भातील निवेदनात म्हटले आहे.
Ballgard 3 Bt Cotton Seeds या संदर्भात बॉलगार्ड ३ बीटी कापूस बियाणे विक‘ीवर निर्बंध घालू नये, एचटीबीटी कापूस बियाणे उत्पादक, व शेतकर्यांवर कारवाई करू नये आणि शेतकर्यांना या एचटीबीटी कापूस बियाण्याची पेरणी करू द्यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या मागण्या केवळ शेतकर्यांच्याच फायद्यासाठी असल्याचा दावा शेतकरी संघटनेचे तंत्रज्ञान व कृषी विज्ञान विस्तार आघाडीप्रमुख मिलिंद दामले यांनी केला आहे.