परसोडी शिवारातील घटना
कारंजा (घा.),
तालुयातील परसोडी शिवारात Bee attacks मधमाशांच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली. तर आगीने होरपळून इसम जखमी झाला. शेतातील आंब्याच्या झाडावर असलेल्या मधमाशांच्या आक्रमकांने शेतकर्यांनी त्या भागातून ये-जा करणे बंद केले आहे. दोन दिवसांपूर्वी रस्त्याने जात असताना एका महिलेवर मधमाशांनी अचानक हल्ला केला.
Bee attacks यात महिला गंभीर जखमी झाली. तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला नागपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. आहे. माशांचा बंदोबस्त करण्यासाठी सकाळच्या सुमारास आंब्याच्या झाडाखाली आग लावून धूर करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मधमाशा आणखीनच आक्रमक झाल्या आणि त्यांनी त्या इसमावर हल्ला केला. याच दरम्यान त्याचा पाय घसरल्याने आगीत पडल्याने तो भाजल्या गेला. त्याला तातडीने कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.