विवाहित युवकाचा तरुणीवर बलात्कार

    दिनांक :19-Apr-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
Beltaredi Rape Case नातेवाईक असलेल्या 21 वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर लग्न करण्यास नकार दिला. या प्रकरणी तरुणीने बेलतराेडी पाेलिस ठाण्यात लैंगिक शाेषण केल्याची तक्रार दिली. पाेलिसांनी तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला. प्रशांत (वय 38 रा. मानेवाडा) असे युवकाचे नाव आहे.
 
 
dkslsl
 
Beltaredi Rape Case  21 वर्षीय तरुणी ही उच्च शिक्षित असून आराेपी प्रशांत हा तिचा नातेवाईक आहे. प्रशांत विवाहित असून त्याला दाेन मुले आहेत. गेल्यावर्षी मे महिन्यात ताे तरुणीला भेटला. ‘माझा पत्नीसाेबत नेहमी वाद हाेताे. मी तिला घटस्ाेट देणार आहे. त्यानंतर आपण लग्न करु,’ असे आमिष दाखवत त्याने तिला जाळ्यात ओढले. लग्नाचे आमिष दाखवून वेळाेवेळी तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. असे बरेच दिवस झाल्यानंतर तरुणीने लग्नाबाबत विचारणा केली. मात्र, त्याने काही दिवसांपूर्वी तरुणीला लग्नास नकार दिला. त्यानंतर तरुणीने शारीरिक संबंधास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या प्रशांतने तिला धमकी देणे, शिवागाळ करणे आणि बदनामीची धमकी देऊन लैंगिक अत्याचार केला. तरुणीने बेलतराेडी पाेलिसांत तक्रार दिली. पाेलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.