वर्धा,
Brahmin Sabha: Haldi-Kumkum program ब्राह्मण सभा वर्धा यांच्या वतीने चैत्र गौरी हळदी-कुंकू कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. मृदुला जोशी, संयोजक नीता गुरू, गौरी देशमुख, न्यू इंग्लिश हायस्कूलच्या माजी मुख्याध्यापिका अनघा आगवन यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय अनघा आगवन यांनी करून दिला.
Brahmin Sabha: Haldi-Kumkum program कार्यक्रमात जोगवा सादरीकरण अश्विनी कुलकर्णी व संगीता पागे यांनी सादर केले. तिन्ही सांजा हे गाणे अश्विनी कुलकर्णी व चंद्र आहे साक्षीला संगीता पागे यांनी सादर केले. मोगरा फुलला हे गाणे शुभांगी धोंगडी यांनी सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. डॉ. मृदुला जोशी यांनी स्त्रीस्वास्थ्य आणि रजोनिवृत्ती या विषयावर मार्गदर्शन केले. अवनी धवने हिने सादर केलेल्या भारतीय नृत्याने कार्यक्रमात रंगत आणली. संचालन अनुश्री जोशी यांनी केले. उत्तरार्धात श्वेता देशपांडे यांनी विविध खेळांचे आयोजन केले. अनुपमा सहत्रबुद्धे यांनी आभार मानले.