21 व 22 एप्रिल रोजी ऑनलाइन नोंदणी
चंद्रपूर,
Buddha Purnima in Tadoba ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रशासनातर्फे 1 मे रोजी, बुद्ध पोर्णिमानिमित्त निसर्ग अनुभव-2026 या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये निसर्गप्रेमींना व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील पाणवठ्यावरील मचानवरून रात्रभर वन्यजीव निरीक्षणाचा अनोखा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी ऑनलाइन नोंदणी 21 एप्रिल रोजी सकाळी 11 ते 22 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध राहील.
अर्जदारांचे वय 18 ते 50 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. एकूण 57 मचान उपलब्ध असून, प्रत्येक मचानवर कमाल 2 सहभागी राहू शकतात. निवड प्रक्रिया प्रथम येणार्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर करण्यात येईल व यशस्वी ऑनलाइन नोंदणी व शुल्क भरल्यानंतर नोंदणी निश्चित करण्यात येईल. ताडोबा क्षेत्र संचालक यांचा निर्णय अंतिम राहील.
Buddha Purnima in Tadoba मागील वर्षी प्रति मचान एकूण शुल्क 4 हजार 500 प्रत्यक्ष भरावे लागत होते. यावर्षी शुल्कात कपात करून अधिक सहभाग प्रोत्साहित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यावर्षी सहभाग शुल्क प्रति मचान 3 हजार 500 (कमाल 2 व्यक्तीसाठी) निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये 1500 ऑनलाइन नोंदणी शुल्क (न परतविण्यायोग्य) व 13 हजार रुपये शुल्क सफारी गेटवर भरावे लागतील. मचान बुकिंग झाल्यानंतर रद्द करण्याची कोणतीही तरतूद राहणार नाही. तसेच, बुकिंग झालेल्या प्रवेशव्दार परवान्यातील व्यक्तीच्या नावामध्ये कोणताही बदल करता येणार नाही. सहभागीनी 1 मे रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यंत त्यांना नेमून दिलेल्या सफारी गेटवर हजर राहणे आवश्यक आहे. कार्यक्रमाची समाप्ती 2 मे रोजी सकाळी 6 वाजता होईल. वाहतूक व्यवस्था केवळ ताडोबा अधिकृत वाहनांद्वारे करण्यात येईल. खाजगी वाहनांना परवानगी दिली जाणार नाही. हा उपक्रम वन्यजीव संवर्धनाबाबत जनजागृती व जबाबदार पर्यावरण पर्यटनाला चालना देण्यासाठी राबविण्यात येत असून नैसर्गिक अधिवासात वन्यजीवांचे निरीक्षण करण्याची दुर्मिळ संधी उपलब्ध करून देतो, असे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक डॉ. प्रभूनाथ शुक्ल यांनी केले आहे.