कमलाताईंचे सेवाकार्य मूल्य म्हणून जपा

    दिनांक :19-Apr-2026
Total Views |
- मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
- मातृसेवा संघाचा शतकोत्तर वर्धापन दिन
- प्रसविका प्रशिक्षण केंद्राची शतकी वाटचाल

नागपूर, 
मातृसेवा संघ ही पारतंत्र्याच्या काळात स्थापन झालेली संस्था आहे. त्यावेळी भारतीय महिलांना इंग‘जांच्या हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी जाता येत नसे. ही बाब हेरून कमलाताईंनी मातृसेवा संघाची स्थापना केली. त्यांचे कार्य अव्याहतपणे सुरू आहे, त्यांचे सेवाकार्य मूल्य म्हणून जपण्याची गरज प्रतिपादन CM Devendra Fadnavis मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांनी केले.
 
 
devenra
 
मातृसेवा संघाचा १०५ वा वर्धापनदिन व प्रसविका प्रशिक्षण केंद्राचा शताब्दी वर्षात पदार्पण कार्यक‘मात मुख्यमंत्री बोलत होते. याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्ष डॉ. अरुणा बाभुळकर, सचिव डॉ. लता देशमुख, महापौर नीता ठाकरे, उपमहापौर लीला हाथीबेड, उपाध्यक्षा रश्मी भावे, वैद्यकीय अधीक्षिका डॉ. पुष्पा भावे व्यासपीठावर उपस्थित होत्या. फडणवीस म्हणाले की, मातृसेवा संघात महिलांसाठी निरनिराळे उपक‘म चालविण्यात येतात. पण शतकानंतर आजदेखील त्यात व्यावसायिकता आलेली नाही. अजूनही स्वयंसेवी संस्था म्हणूनच काम सुरू आहे. प्रसविका केंद्राच्या नव्या इमारत उभारणीतदेखील आम्ही सहकार्य करू.
 
 
CM Devendra Fadnavis  महापौर नीता ठाकरे म्हणाल्या की, नागपुरात सूतिकागृहाप्रमाणेच परगावाहून येणार्‍या महिलांसाठी ‘शेल्टर होम’ आवश्यक आहे. मनपातर्फे ही सोय गरज असल्याचे त्यांनी सांगितले. दीपप्रज्वलन व चैत्रगौरी पूजनाने कार्यक‘माचा शुभारंभ झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी संस्थापिका कमलाताई होस्पेट आणि वेणूताई नेने यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण केले. सचिव डॉ. लता देशमुख यांनी संस्थेच्या कार्याची वाटचाल सांगितली. शताब्दी वर्ष पूर्ण करणार्‍या प्रसविका प्रशिक्षण केंद्राच्या स्थापनेनिमित्त आयोजित कार्यक‘मांची माहिती दिली. परिचारिका प्रशिक्षण केंद्राच्या शताब्दी वर्षातील ऑनलाईन शुभारंभ व वृक्षारोपण मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. राष्ट्रगीताने कार्यक‘माची सांगता झाली. यशश्री वाघ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येत उपस्थित होते.