दारव्हा,
Cricket club pitch गुल्हाने ग्राऊंड बायपास रोड दारव्हा येथे एकता व राजस्थानी क्रिकेट क्लबच्या वतीने नवीन कि‘केट खेळपट्टीचे उद्घाटन थाटात झाले. याप्रसंगी उद्घाटक पोलिस उपनिरीक्षक शिवा कायंदे, महालक्ष्मी ज्वेलर्सचे संचालक राहुल वर्मा, पत्रकार राम पापळकर, संतोष येडमे यांनी खेळपट्टीचे पूजन व उद्घाटन केले.
Cricket club pitch याप्रसंगी एकता व राजस्थानी क्रिकेट क्लबचे सर्व सदस्य लाला पांडे, भैरव भेंडे, बंडु काने, स्वप्नील रोडे, गणेश दुबे, अमित पाटील, दिनेश कोठारी, भूषण राठी, आनंद झोळ, क्रिष्णा निंबर्ते, विपुल सिंगी, उमेश चव्हाण, बाबू पांडे, मयूर आडे, पवन राठी, अॅड. सौरभ राठी, यश पाटील, राजवीर चव्हाण, सफल साबद्रा, प्रशांत भरुड, संदीप चव्हाण, दिनेश जवके, निपुण, धैर्य, अॅड. आशिष देशमुख, चिरायू आणि विरम कोठारी इत्यादी खेळाडू व मोठ्या संख्येने क्रिकेटचा चाहता वर्ग उपस्थित होता. उद्घाटनानंतर झालेल्या अतिशय चुरशीच्या सामन्यात लाला पांडेच्या संघाने भूषण राठी व संतोष येडमे यांच्या संघावर निसटता विजय मिळविला. खेळपट्टी दिसायला सपाट दिसत असली तरी ती खेळपट्टी गोलंदाजीसाठी अनुकूल खेळ करत होती. त्यामुळे फलंदाजांची निराशा झाली मात्र सर्वच गोलंदाज खेळपट्टीचे भरभरून कौतुक करत होते.