राम मंदिर, संसदेवर होता हल्ल्याचा कट

दिल्लीत चार अतिरेकींना अटक, खेळण्यातील कारने स्फोट घडवण्याची होती योजना

    दिनांक :19-Apr-2026
Total Views |
नवी दिल्ली,
terror plot arrest दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने महाराष्ट्र, ओडिशा आणि बिहारमधून अटक केलेले चार कट्टरपंथी अतिरेकी दहशतवादी कारवायांचा कट रचत होते. त्यांनी संवेदनशील ठिकाणांना लक्ष्य करण्यासाठी त्यांची पाहणी केली होती. ते एनक्रिप्टेड ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे इतर कट्टरपंथींची भरती करण्याचा प्रयत्नात होते. मोसाईब अहमद, मोहम्मद हम्माद, मोहम्मद सोहेल आणि शेख इम्रान, अशी आरोपींची नावे आहे.
 

Delhi terror plot arrest 
स्पेशल सेलच्या एका अधिकाèयाने सांगितले की, या कारवाईदरम्यान एक स्फोटक उपकरण आणि संबंधित साहित्य जप्त करण्यात आले. आरोपींपैकी दोघे गर्दीच्या ठिकाणी लक्ष्य साधण्यासाठी आयईडीने सुसज्ज असलेली रिमोट-कंट्रोल खेळण्यातील कार तयार करत होते. ते काळे झेंडे घेऊन फिरणाèया खोरासानच्या लश्कराच्या संकल्पनेनेही प्रेरित होते, ज्याचा वापर ते इतरांना कट्टरपंथी बनवण्यासाठी आपल्या प्रचाराचा भाग म्हणून करत होते.
एनक्रिप्टेड सोशल मीडिया ग्रुप्सवर होते सक्रिय
ते पुढे म्हणाले, आरोपी बंद terror plot arrest आणि एनक्रिप्टेड सोशल मीडिया ग्रुप्सवर सक्रिय होते. तिथे ते जिहाद, कट्टरपंथी विचारसरणी आणि शस्त्रांशी संबंधित मजकूर शेअर केला जात होता. नवीन सदस्यांना ओळखण्यासाठी आणि त्यांची भरती करण्यासाठी या प्लॅटफॉर्मचा वापर केला जात असल्याचा आरोप आहे
आरोपींपैकी एक जण डिसेंबर 2025 मध्ये दिल्लीत आला होता. त्याने लाल किल्ला व इंडिया गेटसह महत्त्वाच्या ठिकाणांची पाहणी केली. तपासकर्त्यांनी सांगितले की, या गटाने अयोध्येतील राम मंदिर, संसद भवन आणि काही लष्करी तळांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांवर संभाव्य हल्ल्यांबाबही चर्चा केली होती.