ठेवीदारांची ४३ लाखांनी फसवणूक

    दिनांक :19-Apr-2026
Total Views |
हिंगणघाट, 
Depositor fraud येथील गांधी वार्डातील ढोकेश्वर मल्टीस्टेट अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने ठेवीदारांना जास्त व्याजाचे आमिष देऊन तब्बल ४३ लाख रुपयांनी फसवणूक केली. तक्रारीवरून हिंगणघाट पोलिसांनी बँकेच्या सहा कर्मचार्‍यांविरूद्ध गुन्हा नोंद केला आहे. गांधी वार्डात ढोकेश्वर मल्टीस्टेट अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची शाखा आहे. या शाखेत श्रीराम काळे, तळेगाव श्या. पंत, अक्षय भुगुल रा. आर्वी, वैभव चौधरी रा. गडचांदूर, स्वप्नील धुळे रा. कन्नमवारग्राम, प्रशांत तायडे रा. तळेगाव श्या. पंत, ललिता वाटेकर रा. कोचर वार्ड हे कर्मचारी आहेत.
 
 
money
 
Depositor fraud सुधीर सुपारे (४५) रा. न्यू यशवंतनगर यांनी त्यांचे शेत विकल्याने त्यांच्याजवळ मोठी रकम होती. दरम्यान, या सोसायटीतील पदाधिकार्‍यांनी त्यांना शाखेत बोलविले व राष्ट्रीयीकृत बँकेपेक्षा जास्त व्याजदर देण्याचे आमिष दिले. सुपारे यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून ललिता वाटकर यांच्या माध्यमातून एक वर्षाकरिता १५ लाख रुपयांच्या एफ. डी. काढल्या. त्याच्या रितसर पावत्या सुद्धा घेतल्या होत्या. एक वर्षाचा कालावधी झाल्यानंतर सुपारे पैसे काढण्याकरिता बँकेत गेले. परंतु, त्यांना वेगवेगळी कारणे देऊन पैसे काढण्यास नकार दिला. याच सोसायटीत लालचंद भुतडा ३ लाख ७० हजार, विजय पराशर १ लाख, रजनी हुलके १० लाख, सुरेश राखुंडे १ लाख २५ हजार, अनिल राखुंडे २५ हजार, लक्ष्मण महल्ले ५५ हजार अशी ४३ लाख ८ हजार रुपयांची गुंतवूणक केल्याचे पुढे आले. ठेवीदारांनी वारंवार पैशांची मागणी केली असता त्यांनी टाळाटाळ केली. येथील पदाधिकार्‍यांनी ही रकम मुळ शाखेत जमा न करता आपल्या फायद्याकरिता परस्पर वापरून फसवणूक केल्याचे लक्षात आले. तक्रारीवरून हिंगणघाट पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.