सेलू,
स्थानिक विकास चौकात Dr. Ambedkar Jayanti डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त शोभायात्रेत सहभागी आंबेडकरी अनुयायींकरिता गरीब नवाज तंजिम कमिटीच्या वतीने शितपेयाचे वाटप करण्यात आले. मुस्लिमांनी पुढाकार घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सेवा दिल्याने समाजात एकोपा आणि प्रेमाचा संदेश यानिमित्ताने देण्यात आला. कमिटीच्या या सेवाभावी वृत्तीचे नागरिकांनी कौतुक केले.
Dr. Ambedkar Jayanti या उपक्रमात हिम्मत अली शाह, इम्रान पठाण, इकबाल शेख, कदीर पठाण, रिजवान शेख, जलील शेख, हनिफ सय्यद, आदिल शेख, काशिनाथ लोणकर, नविनकुमार पाटील गुरुजी, सारंग तायडे, जुबेर शेख, रहीम शेख, सुजल कुंभलकर, अरशद पठाण, अहमद शाह, सलमान पठाण, शालिक भगत, नरेश धनवीज, निखिल नंदेश्वर, शंकर पाणबुडे यांनी सहभाग घेतला होता.