डॉ. आंबेडकरांच्या चळवळीला हवे सामाजिक ऐयाचे बळ : डॉ. सहारे

    दिनांक :19-Apr-2026
Total Views |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयात जयंती उत्सव
 
वर्धा, 
आज समाजा-समाजात गटातटाचे राजकारण आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी समाज आजही विखुरलेला दिसून येतो. विखुरलेला समाज एक होणे गरजेचे आहे. सामाजिक ऐयाशिवाय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ यशस्वी होऊ शकत नाही, असे मत प्रा. Dr. Ashish Sahare डॉ. आशिष सहारे यांनी व्यत केले. नालवाडी येथील देशपांडे ले-आऊट नागसेननगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयात आयोजित जयंती उत्सव कार्यक्रमातात ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून पंकज वंजारे, सुषमा पाखरे, रोशन पाटील, तळवेकर यांची उपस्थिती होती.
 
 
sahare
 
Dr. Ashish Sahare  डॉ. सहारे पुढे म्हणाले की, बुद्ध विहार हे केवळ धार्मिक स्थळ नसून ते सामाजिक परिवर्तनाचे केंद्र असले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ ही बुद्ध विहारातूनच पुढे नेली गेली पाहिजे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन बाबासाहेबांच्या चळवळीचा रथ अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. पंकज वंजारे यांनी, प्रत्येक गोष्टीकडे अंधश्रद्धेपेक्षा विवेक आणि चिकित्सक दृष्टीने पाहण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. सुषमा पाखरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. यावेळी लहान मुलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. दरम्यान, महिलांनी सादर केलेले समूह नृत्य आणि समूह गीताने उपस्थितांची मने जिंकली. संचालन सुनील जीवने, प्रास्ताविक दिनेश वाणी यांनी केले. आभार अश्विनी वानखेडे यांनी मानले. कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.