वायुदलाच्या ‘गरुड’चे बळकट होणार पंख

-मिळणार छोटेखानी ‘यूएव्ही’

    दिनांक :19-Apr-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Indian Air Force वायुदलाच्या गरुड या विशेष दलासाठी एका छोटेखानी मानवरहित हवाई वाहन (यूएव्ही) प्रणालीच्या खरेदीची प्रक्रिया सरकारने सुरू केली आहे. ही प्रणाली अत्यंत प्रतिकूल पर्यावरणीय परिस्थितीत आणि समुद्रसपाटीपासून 16,400 फुटांपर्यंत उंचीवरही कार्यरत राहण्यास सक्षम आहे.
 

Garud special forces, Indian Air Force UAV 
ही नियोजित प्रणाली अतिशय उंचावरून पाळत ठेवण्यासाठी तसेच विविध प्रकारच्या भूप्रदेशात आणि हवामान परिस्थितीत कार्यक्षम मदत पुरवण्याच्या उद्देशाने वापरली जाणार आहे. विद्यमान प्रणालीच्या तुलनेत या प्रणालीची कार्यक्षमता आणि टिकून राहण्याची क्षमता अधिक असेल, अशी अपेक्षा असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले.
संरक्षण मंत्रालयाने अलिकडेच वायुदलाच्या गरुड विशेष दलासाठी सूक्ष्म मानवरहित वाहन प्रणाली खरेदी करण्यासाठी विनंतीपत्र जारी केले आहे. प्रस्तावित प्रणालीमध्ये दिवस-रात्र पाळत ठेवणे, लक्ष्याचा वेध घेणे आणि प्रत्यक्ष वेळेतील परिस्थितीची जाणीव असले या गोष्टींनाही सहाय्य करण्याची क्षमता असावी, असे अधिकाऱ्याने सांगितले. सूक्ष्म मानवरहित वाहन प्रणाली ही विशेष दलांच्या मोहिमांसाठी तयार करण्यात आलेली एक संक्षिप्त, हलकी आणि सहज वाहून नेता येण्यासारखी प्रणाली असेल, अशी कल्पना असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
वायुदलाच्या या विशेष Indian Air Force  तुकडीकडे सध्या तत्सम प्रणाली उपलब्ध आहे. मात्र, नवीन प्रणाली आधुनिक आहे आणि अत्याधुनिक वैशिष्ट्यांनी युक्त, स्वदेशी तंत्रज्ञनाचा वापर करून तयार केलेली असेल, असे या प्रकल्पाची माहिती असलेल्या एका वरिष्ठ अधिकाèयाने सांगितले. ही प्रणाली अत्यंत प्रतिकूल पर्यावरणीय परिस्थितीत काम करण्यास सक्षम आहे. यामध्ये उणे 20 अंश सेल्सिअस ते अधिक 50 अंश सेल्सिअस या श्रेणीतील तापमान आणि समुद्रसपाटीपासून 16,400 फुटांपर्यंतची उंचीचा समावेश आहे, असे त्या अधिकाऱ्याने सांगितले. प्रस्तावित प्रणालीची रेंज वाढवण्यासोबतच तिची काठिण्य पातळीही सुधारण्याची अपेक्षा आहे. नियोजित केल्यानुसार तिचे काही प्रमुख कार्यदर्शन मापदंड अधिकाèयाने सांगितले.
 
 
15 किमी, 60 मिनिटे उड्डाणक्षमता
या यूएव्हीची उड्डाणक्षमता 15 किमी आणि किमान 60 मिनिटे हवेत राहण्याची आहे. याच्या नियंत्रणासाठी केवळ दोन जणांच्या चमूची गरज आहे, असे दुसऱ्या  एका अधिकाèयाने सांगितले. ही प्रणाली जीपीएस विरहित वातावरणातही कार्यरत राहण्यास सक्षम असून, ती भारतीय प्रादेशिक नेव्हिगेशन उपग्रह प्रणालीशी सुसंगत असावी असे अधिकाèयांनी सांगितले.