-घराचा आधारवड हरपला, 40 वर्षीय तरुणाचा गुदमरून मृत्यू
- 10 जण हाेरपळले
अनिल कांबळे
नागपूर/कामठी,
नागपूर जिल्ह्यातील जुनी कामठी येथील गांधीनगर भाजी मंडी परिसरात घरगुती Gas cylinder 'explosion' गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत अतुल उफर् बंटी पानतावणे या 40 वर्षीय तरुणाचा गुदमरुन मृत्यू झाला असून सुमारे 10 जण जखमी झाल्याची माहिती आहे. ही घटना रविवार, 19 एप्रिल राेजी सकाळच्या सुमारास घडली. जुनी कामठी पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पानतावणे कुटुंब सकाळी घरात असताना स्वयंपाकघरात गॅस गळतीमुळे आग लागली आणि त्यानंतर अचानक सिलेंडरचा स्फोट झाला. मिळालेल्या माहितीनुसार, अतुल पानतावणे यांच्या पत्नी चहा बनवण्यासाठी स्वयंपाकघरात गेल्या असता गॅस गळतीमुळे आग लागली. त्यानंतर काही क्षणातच सिलेंडरचा जाेरदार स्ाेट झाला आणि संपूर्ण घरात आग पसरली. घरातील जीवनावश्यक वस्तू, साेन्याचे दागिने, टीव्ही, फ्रीज , कपडे यांसह सर्व साहित्य जळून खाक झाले. या आगीत सुमारे 5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
Gas cylinder 'explosion' दरम्यान, आग लागल्यानंतर पत्नी व मुले घराबाहेर पडण्यात यशस्वी झाले. मात्र, अतुल हे बेडरूममध्येच अडकून पडल्याने त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. घरात लागलेल्या आगीला विझवण्यासाठी विनय पानतावणे, नितीन पानतावणे तसेच शेजारी संध्या ढवळे यांच्यासह इतर काहीजणांनी प्रयत्न केले. यात ते देखील जखमी झाले. या सर्व जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटाेक्यात आणली असली तरी ताेपर्यंत माेठे नुकसान झाले हाेते. याप्रकरणी जुनी कामठी पाेलिस ठाण्यात नाेंद करण्यात आली असून, वरिष्ठ पाेलिस निरीक्षक प्रशांत जुमडे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पाेलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कामठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला असून, या घटनेचा पुढील सखाेल तपास सुरू आहे.
नागरिकांची वाचवण्यासाठी धावपळ
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. आग विझवण्याच्या प्रयत्नात आणि स्फोटाच्या धक्क्याने जवळपास 10 जण जखमी झाले. त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी दाखल हाेत आगीवर नियंत्रण मिळवले.
लाखाे रुपयांचे नुकसान
या भीषण आगीत पानतावणे यांच्या घरातील साेन्याचे दागिने, राेख रक्कम आणि इलेक्ट्राॅनिक वस्तूंसह सुमारे 5 लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. ऐन सकाळी घडलेल्या या घटनेमुळे कामठी परिसरात माेठी खळबळ उडाली असून सर्वत्र शाेककळा पसरली आहे.
प्रतिक्रिया...
ही अत्यंत दुःखद घटना असून मी संवेदना व्यक्त करताे. या घटनेची सखाेल चाैकशी करण्याचे आदेश दिले आहेत, अशी प्रतिक्रिया जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बाेलताना दिली.