-मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती
-कामठीत ‘शहीद हेमंत करकरे’ इमारतीचे लोकार्पण
नागपूर
Government ITI काळाशी सुसंगत नवनवीन आवश्यक कौशल्य शिक्षण व प्रशिक्षण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी येत्या जूनपासून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शासकीय तांत्रिक विद्यालयांमध्ये नवीन अभ्यासक‘म सुरू करू, असे कौशल्य रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी जाहीर केले. कामठीत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शासकीय विद्यालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण व या संस्थेचे ‘शहीद हेमंत करकरे’ असे नामकरण महसूल व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. कौशल्य, रोजगार व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा, माजी आ. देवराव रडके, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचानालयचे संचालक सतीश सूर्यवंशी व मान्यवर उपस्थित होते.
महसूल चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्घाटनपर भाषणात केलेली मागणी नम‘तेने स्वीकारत कामठीत अभ्यासक‘म सुरू करण्यासह येथील प्रशिक्षण संस्थेच्या प्रगतीचा प्रत्येक महिन्याला आढावा घेऊन राज्यातील एक आदर्श शासकीय प्रशिक्षण संस्था म्हणून याला नावारूपास आणू असे मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.
मंगलप्रभात लोढा म्हणाले की, नवतंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, विविध नावीन्यपूर्ण विकास योजना, पारदर्शकता व पातळीवर होणारा विलंब टाळण्यासाठी ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’सार‘या शासनाच्या तत्पर धोरणामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढली. यातून औद्योगिक, सेवा, डिजिटल तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा, सौर विद्युत तंत्रज्ञान क्षेत्रात अफाट रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोराडी परिसरात केलेले कार्य कौतुकास्पद आहे. या ठिकाणी अत्यंत आदर्श कौशल्य विद्यापीठ सर्व क्षमता आहे. त्यांनी दूरदृष्टी ठेवून नियोजन केले, असे लोढा म्हणाले.
Government ITI महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, सौर ऊर्जा तंत्रज्ञान, याची उपकरणे व त्याची निगा, डिजिटल इंडियाला साकारणारे तंत्रज्ञान व सेवाक्षेत्र याला अधोरेखित करून ग‘ामीण भागातील युवकांना या क्षेत्रात निर्माण होणार्या रोजगाराच्या संधीवर स्वार होता यावे यासाठी नवीन कोर्स, शासकीय तंत्रनिकेतनमध्ये सुरू व्हावेत व यातील काही कोर्स कामठी येथे सुरू व्हावे.
बदलत्या काळाप्रमाणे रोजगार व स्वयंरोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण झाल्या. केंद्र सरकार व महाराष्ट्र शासनाने कौशल्य विकासासाठी गत दहा वर्षात सातत्याने प्रयत्नरत राहून ग‘ामीण भागात कौशल्य प्रशिक्षणासाठी शासकीय शैक्षणिक यंत्रणांना नवे रूप दिले आहे. कामठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण विकसित व्हावी, यात आणखी तांत्रिक कौशल्य विध्यार्थ्यांना शिकता यावे यासाठी संस्थेला जिल्हा वार्षिक योजनेतून ४ कोटी ५० लाख रुपये या आर्थिक वर्षात उपलब्ध करून देऊ.
विद्यार्थ्यांनी फक्त प्रमाणपत्र मिळवणे हे अंतिम ध्येय न ठेवता कौशल्ये आत्मसात करावीत, नवीन गोष्टी शिकण्याची तयारी व प्रामाणिकपणे मेहनत करावी असे आवाहन त्यांनी केले. घेतलेले प्रशिक्षण उद्या तुमच्या यशाचा पाया ठरेल, तेे म्हणाले.