भाजपा व वायएसपीचे नवे संपर्क कार्यालय

    दिनांक :19-Apr-2026
Total Views |
पालकमंत्र्यांनी केली पाहणी
लवकरच होणार उद्घाटन
 
अमरावती, 
Guardian Minister Chandrashekhar Bawankule पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी आमदार रवी राणा यांच्या ‘गंगासावित्री’ निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. विविध स्थानिक व विकासात्मक मुद्दांवर सविस्तर चर्चा केली. त्यानंतर पालकमंत्री बावनकुळे यांनी युवा स्वाभिमान पक्ष व भाजप नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांच्या नव्या संपर्क कार्यालयाला भेट देत शहर व जिल्ह्यातील भाजप पदाधिकार्‍यांसोबत सुमारे एक तास बैठक घेतली.
 
 
bawankule
 
Guardian Minister Chandrashekhar Bawankule  बैठकीत अमरावतीच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, प्रलंबित प्रकल्पांना गती देणे आणि शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी यावर विशेष भर देण्यात आला. विशेष म्हणजे, युवा स्वाभिमान पक्ष आणि भाजप नेत्या नवनीत राणा यांच्या संयुक्त संपर्क कार्यालयाचे लवकरच थाटात उद्घाटन होणार असून, त्याच्या पृष्ठभूमीवर पालकमंत्र्यांनी स्थानिक पदाधिकार्‍यांसोबत ही बैठक घेतल्याची माहिती आहे. उद्घाटन सोहळा भव्य स्वरूपात पार पाडण्यासाठी नियोजन, संघटनात्मक समन्वय आणि जनसंपर्क वाढविण्यावरही या बैठकीत चर्चा झाली. याप्रसंगी माजी खासदार नवनीत राणा, भाजपाचे अमरावती शहर जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन धांडे, जिल्हाध्यक्ष रवीराज देशमुख, महापौर श्रीचंद तेजवानी, सुनील राणा, जयंत वानखडे, उपमहापौर सचिन भेंडे, शेखर भोयर, सुनील काळे, नितीन बोरेकर, हर्षल रेवणे, किशोर पीवाल, बाळू इंगोले, सुरज मिश्रा, मधुरा काहाळे, राधा कुरील, ऋषिकेश देशमुख, कल्याणी तायडे, प्रीती रेवणे, सुमती ढोके, नंदा सावदे, नाना आमले, सुनील खराटे, रजनी डोंगरे, बादल कुळकर्णी, प्रदीप हिवसे, विनोद गुहे, ललित समदुरकर, आकाश तायडे, शैलेंद्र मेघवाणी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.