पालकमंत्री डॉ. भोयर यांनी केली जागेची पाहणी
वर्धा,
वर्धा येथे शासकीय विश्रामगृहाची नवीन इमारत बांधण्यात येणार असून जुन्या विश्रामगृहाचे देखील नूतनीकरण होणार आहे. Guardian Minister Dr. Pankaj Bhoyar पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विश्रामगृहाची पाहणी करून अधिकार्यांशी चर्चा केली. दोन्ही विश्रामगृहासाठी १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे.
शासकीय विश्रामगृहात सध्या दोन इमारती कार्यरत आहेत. त्यामध्ये ९ व्हिआयपी सुट सद्या अस्तित्वात आहे. या सर्व सुटचे नूतनीकरण, किचन व पॅन्ट्री बांधकाम व या इमारती अद्यावत करण्यात येणार आहे. ७ कोटी ५० लाख रुपये खर्च करून करण्यात येणार्या या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कामाचा आदेश देण्यात आला आहे. नूतनीकरणाचे सदर काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले.
Guardian Minister Dr. Pankaj Bhoyar येथे अतिमहत्वाच्या व्यतींचे सतत येणे जाणे असते. अशावेळी शासकीय विश्रामगृहात जागा कमी पडते. तसेच उत्तम सुविधा असलेले सुट नसल्याने नवीन इमारत बांधण्याचे निर्देश ना. डॉ. भोयर दिले होते. त्यानुसार २ कोटी ५० लाख रुपयांचा नवीन इमारतीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. नवीन बांधण्यात येणार्या विश्रामगृहाच्या जागेची व नूतनीकरणाच्या कामाची देखील पाहणी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केली. नवीन इमारतीच्या कामाचे आराखडे, मान्यता घेऊन तातडीने प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एकनाथ टिकले, उपअभियंता नयन निस्ताने आदी उपस्थित होते.