नवी दिल्ली,
Gyaneshkumar यापूर्वीच्या नोटीस फेटाळल्या गेल्याचा कोणताही परिणाम न होऊ देता विरोधकांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांना पदावरून हटवण्यासाठी नव्या जोमाने तयारी सुरू केली आहे. यासाठी ते ज्ञानेशकुमाराच्ंया विरोधात नवीन नोटीस आणण्याची तयारी करीत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
विरोधी पक्षांचे नेते सध्या चर्चा करीत असून, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि द्रमुक याच्यासारख्या वेगवेगळ्या पक्षांमधील किमान पाच ज्येष्ठ खासदार, पदावरून दूर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी एक नवीन नोटीस तयार करण्यावर काम करीत आहेत.
मात्र, ही नोटीस Gyaneshkumar संसदेच्या कोणत्या सभागृहात मांडली जाईल किंवा मागील वेळी केल्याप्रमाणे ती दोन्ही सभागृहांत सादर केली जाईल, हे अद्याप निश्चित झालेले नाही, असे त्या सूत्राने सांगितले. शुक्रवारी हे विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्यामुळे उत्साहित झालेले विरोधी पक्षाचे नेते या संदर्भातील नोटीसवर अधिक खासदारांच्या स्वाक्षèया मिळवण्याचे प्रयत्न करीत असून, किमान 200 स्वाक्षèया जमा करण्याचे उद्दिष्ट असल्याचे एका सूत्राने सांगितले.
आम्हाला एक ठाम संदेश द्यायचा आहे. मागील वर्षी आमच्या खासदारांची संख्या कमी लेखली गेली होती. हे आम्हाला सर्वप्रथम सिद्ध करायचे आहे, असे त्या सूत्राने सांगितले. आपल्या आधीच्या नोटिसांमध्ये विरोधकांनी ज्ञानेशकुमार यांच्यावर स्वातंत्र्य आणि घटनात्मक निष्ठा राखण्यात अपयश आल्याचा तसेच कार्यकारी मंडळाच्या दबावाखाली काम केल्याचा आरोप केला होता.